Ajit Pawar : अजित पवारांनी मुलाखती घेतल्या, पण नाव गुलदस्त्यातच; बारामती नगराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखती घेतल्या मात्र त्यानंतर आयोजित मेळाव्यात कोणाचेही नाव जाहीर केले नाही त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा सस्पेन्स कायम राहिला . लवकरच नाव जाहीर करू असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. अंतर्गत बंडाळी टाळण्यासाठी अजित पवार यांनी नाव जाहीर केले नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

शहरातील राष्ट्रवादी भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीकडून बारामती नगरपरिषद माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर आयोजित मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत आपण गुरुवारच्या मुलाखतीनंतर नाव जाहीर करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते.

त्यामुळे आज बारामती नगरपरिषदेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरणार, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. मात्र, मुलाखतीनंतर पवार यांनी कोणाचीही नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केले नाही. दोन-तीन दिवसांत नाव जाहीर केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवार कोणीही असला तरी अजित पवार यांची राष्ट्रवादी व घड्याळ डोळ्यासमोर ठेवून कामाला लागण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या.

गट, तट, भावकी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवा. एकादिलाने सर्वजण एकत्र येऊन काम करा. नगराध्यक्ष पदाचा चेहरा सर्व समावेश असेल. गेली ३५ वर्षे आपण राजकारणात आहोत त्यामुळे कोणता नगराध्यक्ष द्यायचा हे मला चांगलंच कळतं असे अजित पवार यावेळी म्हणाले.बारामती नगरपरिषद तसेच माळेगाव नगरपंचायत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आज राष्ट्रवादी भवन येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

अजित पवार यांनी बारामती नगर परिषदेच्या वीस प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.माळेगाव नगरपंचायतीच्या सत्र प्रभागातील इच्छुकांच्या देखील त्यांनी मुलाखती घेतल्या. सर्वांना संधी देणे शक्य नाही. मुलाखती दरम्यान आलेले अनुभव त्यांनी मेळाव्यात सांगितले. बारामती नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांना त्यांनी बारामती शहरासाठी तुमचे व्हिजन काय, गेल्या दहा वर्षात बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून किती विकासकामे झाली, बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची संख्या, अशा प्रश्नांची सरबत्ती केली.

३३०० कोटींची विकासकामे..
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या दहा वर्षात बारामती शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. बारामती नगर परिषदेचे उत्पन्न ३२५ कोटी रुपये एवढे जमा झाले. मात्र शहरात ३ हजार ३०० कोटी रुपयांची विकास कामे झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी विकास कामांना मिळवून दिल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

माळेगाव रोड मॉडेल करू..
माळेगाव नगरपंचायतीसाठी देखील गेल्या पाच वर्षात जवळपास 350 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. माळेगावची नगरपंचायत आपल्या ताब्यात दिल्यास रोड मॉडेल अशी माळेगाव नगरपंचायत बनवून दाखवतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले. माळेगावच्या गट, तट गावठी भावकीवर देखील अजित पवार बोलले.

The post Ajit Pawar : अजित पवारांनी मुलाखती घेतल्या, पण नाव गुलदस्त्यातच; बारामती नगराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!