
अहिल्यानगर : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये देशात ०५ व्या स्थानावर असलेली युनियन बँक ऑफ इंडिया चौफेर प्रगती करत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकाभिमुख सेवा देण्यात कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन युनियन बँक ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख सुनिलकुमार यादव यांनी केले. बँकेच्या 107 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ग्राहक मेळाव्यात यादव बोलत होते.
बँकेच्या स्थापनेविषयी सांगताना ते म्हणाले की, बँकेची स्थापना 11 नोव्हेंबर 1919 रोजी झाली. शेठ सिताराम पोतदार हे प्रवर्तक होते. मुख्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते १९२१ मध्ये झाले. आज बँकेच्या ८६०० हून अधिक शाखा आहेत. ९००० हून अधिक एटीएम, २५ हजाराहुन अधिक बीसी पॉईंट्स, ७५ हजारहून अधिक कर्मचारी आहेत.
बँकेच्या प्रगती विषयी श्री यादव यांनी सांगितले की, सप्टेंबर 2025 अखेर बँकेचा एकूण व्यवसाय २२.०९ लाख कोटी आहे. यामध्ये १२.३४ लाख कोटींच्या ठेवी व ९.७५ लाख कोटींचे कर्ज वितरण आहे. बँकेचा शाखा विस्तार परदेशात देखील असून हॉंगकॉंग येथे ३, दुबई इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर व सिडनी ऑस्ट्रेलिया येथे प्रत्येकी १, अबुधाबी येथे प्रतिनिधी कार्यालय, लंडन, मलेशिया आदी ठिकाणी शाखा विस्तार आहे.
अशा या गौरवशाली 107 वर्षांची परंपरा असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या प्रगतीमध्ये सर्व खातेदार ग्राहक, कर्जदार, अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे असल्याचे यावेळी यादव म्हणाले.
१०७ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित ग्राहक मेळाव्यामध्ये भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाचे सचिव एम. नागाराजू हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या युनियन बीझ या मोबाईल ॲपचे तर रिटेल ग्राहकांसाठी युनियन इझ या मोबाईल ॲपचे लॉन्चिंग करण्यात आले. याच बरोबर देशातील 51 नवीन शाखांचे ऑनलाइन उद्घाटन एम. नागाराजू यांचे हस्ते करण्यात आले. यामध्ये अहिल्यानगर एमआयडीसी नागापूर येथील शाखेचा समावेश आहे. विकसित भारत 2047 या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास देखील एम. नागाराजू यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अहिल्यानगर येथील ग्राहक मेळाव्याच्या वेळी करण्यात आले. यावेळी उप क्षेत्रप्रमुख अमित कुमार सिन्हा, सुभाष गजभिये यांसह विविध शाखा प्रमुख, विभाग प्रमुख अधिकारी – कर्मचारी, ग्राहक, शुभचिंतक, कर्जदार, खातेदार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The post अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया कटिबद्ध : क्षेत्रीय प्रमुख सुनिल कुमार यादव appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











