107 वर्षांची युनियन बँकेची भरारी; महात्मा गांधींच्या हस्ते सुरू, आज 8600 शाखा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

अहिल्यानगर – युनियन बँक ऑफ इंडिया चौफेर प्रगती करत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकाभिमुख सेवा देण्यात कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन युनियन बँक ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख सुनिलकुमार यादव यांनी केले. बँकेच्या 107 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ग्राहक मेळाव्यात यादव बोलत होते.

ते म्हणाले की, बँकेची स्थापना 11 नोव्हेंबर 1919 रोजी झाली. शेठ सिताराम पोतदार हे प्रवर्तक होते. मुख्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते 1921 मध्ये झाले. आज बँकेच्या 8,600 हून अधिक शाखा आहेत. 9000 हून अधिक एटीएम, 25 हजाराहुन अधिक बीसी पॉईंट्स, 75 हजाराहून अधिक कर्मचारी आहेत.

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाचे सचिव एम. नागाराजू हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यावसायिकांसाठी 51 नवीन शाखांचे एम. नागाराजू यांचे हस्ते दूरस्थ करण्यात आले. यामध्ये अहिल्यानगर, एमआयडीसी नागापूर येथील शाखेचा समावेश आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अहिल्यानगर येथील ग्राहक मेळाव्याच्या वेळी करण्यात आले. यावेळी उप क्षेत्रप्रमुख अमित कुमार सिन्हा, सुभाष गजभिये यांसह विविध शाखा प्रमुख, विभाग प्रमुख अधिकारी – कर्मचारी, ग्राहक, शुभचिंतक, कर्जदार, खातेदार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post 107 वर्षांची युनियन बँकेची भरारी; महात्मा गांधींच्या हस्ते सुरू, आज 8600 शाखा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!