
Retail Inflation : वस्तू व सेवा कर (GST) दरांमध्ये करण्यात आलेली कपात आणि भाजीपाला तसेच फळांच्या दरांतील मोठी घट, या दोन प्रमुख कारणांमुळे किरकोळ महागाई दराने (Retail Inflation) ऑक्टोबर महिन्यात अनेक वर्षांमधील विक्रमी नीचांकी पातळी गाठली आहे. केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, हा दर केवळ ०.२५ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित हा महागाई दर सप्टेंबर महिन्यात १.४४ टक्के होता, तर मागील वर्षी (ऑक्टोबर २०२४) तो तब्बल ६.२१ टक्के इतका मोठा होता. या तुलनेत महागाईत झालेली मोठी घसरण दिलासादायक मानली जात आहे.
अन्न महागाई शून्याखाली-
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अन्न महागाईचा (Food Inflation) विचार केल्यास, ऑक्टोबरमध्ये तिने शून्याखालील पातळी गाठली आहे. अन्न महागाई दर उणे ५.०२ टक्के (-५.०२%) इतका खाली आला आहे.
NSO ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, ऑक्टोबर २०२५ मध्ये एकूण आणि अन्न महागाईमध्ये झालेली ही मोठी घट प्रामुख्याने जीएसटी दरातील कपात, अनुकूल ‘आधार प्रभाव’ (Base Effect), तेल व चरबी, फळे, अंडी, पादत्राणे, धान्य, वाहतूक आणि दळणवळण यांसारख्या वस्तूंच्या महागाई दरात आलेली शिथिलता या कारणामुळे आलेली आहे. या विक्रमी नीचांकी महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून, अर्थव्यवस्थेवरचा दबावही काही प्रमाणात कमी झाला आहे.
The post Retail Inflation: जीएसटी कपातीचा फायदा…. किरकोळ महागाई विक्रमी नीचांकी पातळीवर; ऑक्टोबरमध्ये केवळ 0.25% ची नोंद appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











