
work from home : अमेरिकेतील मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी पॅरामाऊंट स्कायडान्स (Paramount Skydance) कंपनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण कंपनीने ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘रिमोट वर्किंग’चं धोरण रद्द केल्यानंतर तब्बल ६०० कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी नोकरीचा राजीनामा दिला आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डेव्हिड एलिसन यांनी नुकतंच जाहीर केलं की, आता सर्व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात येऊन प्रत्यक्ष काम करावं लागेल. त्यांनी सांगितलं, “आपल्या उद्योगात प्रत्यक्ष एकत्र बसून काम करणं, कल्पनांची देवाणघेवाण करणं आणि संवाद वाढवणं हेच यशाचं गमक आहे.”
एलिसन यांनी हेही स्पष्ट केलं की, “ऑफिसमध्ये उपस्थित राहणं म्हणजे फक्त हजेरी लावणं नव्हे, तर व्यवसायात सक्रीय सहभाग घेणं आणि सहकाऱ्यांशी मजबूत नातं बांधणं आहे. या प्रक्रियेतूनच नवनवीन कल्पना आणि उपाय जन्माला येतात. हे सर्व मी माझ्या करिअरमध्ये प्रत्यक्ष अनुभवातून शिकलोय, झूम मीटिंगमधून नाही.” असं त्यांनी म्हंटलं आहे.
एलिसन यांच्या या निर्णयानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काम करण्याऐवजी कंपनीची स्वेच्छानिवृत्ती योजना (Severance / Buyout Package) स्वीकारली. ६०० कर्मचाऱ्यांनी हा पर्याय स्वीकारल्यामुळे कंपनीला सुमारे १८५ दशलक्ष डॉलर्सचा खर्च आला आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क कार्यालयांतील उपाध्यक्ष पदापर्यंतचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी आहेत.
वर्क फ्रॉम होम का बंद केलं?
एलिसन यांनी सांगितलं की, “मी विश्वास ठेवतो की एकत्र काम करणं हेच यशाचं मूळ आहे. जेव्हा लोक एकाच जागी असतात, तेव्हा विचारांची देवाणघेवाण होते, समस्यांचं निराकरण लवकर होतं आणि टीमवर्क मजबूत होतं. म्हणूनच वर्क फ्रॉम होमपेक्षा ऑफिसमधून काम करणं अधिक परिणामकारक आहे.”
पॅरामाऊंट आणि स्कायडान्स मीडिया या दोन मोठ्या कंपन्यांचं ऑगस्ट २०२५ मध्ये ८ अब्ज डॉलर्समध्ये विलीनीकरण झालं. त्यानंतर डेव्हिड एलिसन यांनी या नव्या मीडिया समूहाची जबाबदारी स्वीकारली. कंपनीची कार्यसंस्कृती बदलण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांनी हा नवीन निर्णय घेतला.
दरम्यान, एलिसन यांच्या या निर्णयाने कंपनीतील कामकाजाच्या पद्धतीत मोठा बदल घडवून आणला आहे. काहींनी हा निर्णय “सकारात्मक पाऊल” मानला आहे, तर अनेक कर्मचाऱ्यांनी लवचिक कामाची संधी गमावल्याची खंत व्यक्त केली आहे.
The post ऑफिसमध्ये या नाहीतर नोकरी सोडा.! ‘वर्क फ्रॉम होम’ बंद करतो म्हणताच ६०० कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











