
धाराशिव: खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या लोहारा पोलीस ठाण्याच्या एका अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर लोहारा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्यासह एकूण चार कर्मचाऱ्यांवर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहारा येथील एका 32 वर्षीय शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने जवळ पैसे नसल्याने दहा तोळे सोन्याचे कडे तारण ठेवून आपल्या भावाकरवी चार लाख रुपये दिले होते. मात्र, त्यानंतरही पोलिसांनी उर्वरित पाच लाख रुपयांसाठी तगादा सुरूच ठेवला.
एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, पोलीस अंमलदार आकाश भोसले आणि निवृत्ती बोळके यांनी तक्रारदाराचे सोन्याचे कडे स्वतःकडे ठेवल्याचे उघड झाले. तसेच, प्रभारी निरीक्षक कुकलारे यांनी तीन लाख रुपये घेतले असून उर्वरित दोन लाख रुपये अंमलदार भोसले किंवा तिघाडे यांच्याकडे देण्यास सांगितले होते.
यानंतर एसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहा वाजता भातागळी (ता. लोहारा) येथील शेतामध्ये सापळा रचला. तक्रारदाराकडून पोलीस अंमलदार अर्जुन तिघाडे याने दोन लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला तातडीने अटक केली. या कारवाईत रोख रक्कम आणि संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी पोलीस अंमलदार अर्जुन तिघाडे याच्यासह प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस शिपाई आकाश भोसले आणि निवृत्ती बोळके यांच्याविरुद्ध लाच मागणी व स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या या धडक कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
The post पोलीस दलात मोठी खळबळ: पाच लाखांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह चौघांवर गुन्हा appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











