
Realme कंपनीने नुकताच त्यांचा नवीनतम फ्लॅगशिप असलेला Realme GT 8 Pro Aston Martin F1 Limited Edition हा स्मॉर्टफोन लाँच केला आहे. तर हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. तर हा स्मार्टफोन लिमिटेड ॲडिशन असलेल्या मॉडेलमध्ये रेसिंग-प्रेरित डिझाइन आणि आलिशान फिनिशसह बाजारात लाँच केला आहे. फोनमध्ये Aston Martin ची खास ग्रीन फिनिश, सिल्व्हर-विंग लोगो आणि एक्सक्लुझिव्ह पॅकेजिंग आहे, ज्यामध्ये F1 कार-आकाराचा सिम इजेक्टर आणि थीम असलेली फोन केस समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त हा फोन F1-स्टाइल वॉलपेपर आणि कॅमेरा वॉटरमार्कसह देखील येते.
Realme GT 8 Pro Aston Martin F1 Edition ची किंमत
Realme GT 8 Pro Aston Martin F1 Edition ची चीनमध्ये किंमत CNY 5,499 युआन म्हणजेच आपल्या भारतीय चलनानुसार अंदाजे 68,000 रूपये इतके आहे. त्यामध्ये – 16GB RAM आणि 1TB स्टोरेज असलेला हा एकच व्हेरिएंट आहे. हा फोन Aston Martin Racing Green रंगात उपलब्ध आहे. त्यानंतर यात Realme GT 8 Pro ची किंमत CNY 5,199 युआन भारतीय चलनानुसार अंदाजे 64,000 रूपये आहे. तर Realme GT 8 Pro भारतात 20 नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे आणि Aston Martin F1 लिमिटेड एडिशन भारतीय बाजारात त्याच वेळी लाँच होण्याची अपेक्षा आहे.
Realme GT 8 Pro: डिस्प्ले आणि प्रोसेसर
या फोनमध्ये 6.79-इंचाचा QHD+ (1,440× 3,136 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
डिस्प्लेची क्वॉलिटी उच्च दर्जाची फ्लॅगशिप लेवलची आहे, जी स्मूथ गेमिंग आणि मल्टीमीडिया अनुभव देते.
स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 एसओसी द्वारे समर्थित 16 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेजसह, हे कॉम्बिनेशन या फोनला एक पॉवरफुल आणि एनर्जी-अफिशिएंट डिव्हाइस बनवते. हा फोन रिअलमी UI 7.0 वर चालतो, जो कस्टम F1-थीम इंटरफेससह येतो.
Realme GT 8 Pro: कॅमेरा आणि बॅटरी पॉवर
रियलमीच्या या फोनच्या कॅमेऱ्या बाबतीत बोलायचे झाले तर, Realme GT 8 Pro Aston Martin F1 Edition मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे – 50MP Ricoh GR प्रायमरी लेन्स, 50MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 200MP टेलिफोटो सेन्सर. 32MP फ्रंट कॅमेरा उत्कृष्ट सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग अनुभव देतो. फोनमध्ये 7000mAh बॅटरी आहे जी 120W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. तर या फोनमध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी लाइफ आणि काही मिनिटांत पूर्ण चार्जिंग सुनिश्चित करते. सुरक्षिततेसाठी, यात अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक आहे. फोन IP69+IP68+IP66 प्रमाणित आहे, ज्यामुळे तो धूळ आणि पाणी प्रतिरोधक बनतो.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











