
natural hair dye: केमिकलयुक्त हेअर डायमुळे केसांचे नुकसान होण्याची भीती वाटतेय? आता काळजी करण्याचं काही कारण नाही! फक्त दोन नैसर्गिक घटकांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी सुरक्षित आणि प्रभावी केमिकल-फ्री हेअर डाई तयार करू शकता.
बाजारातील डायचे दुष्परिणाम
बाजारात मिळणाऱ्या बहुतांश हेअर डायमध्ये अमोनिया आणि इतर केमिकल्स असतात. हे केसांचे नैसर्गिक तेल नष्ट करून त्यांना कोरडे, तुटणारे आणि गळणारे बनवतात. अशा डाईचा दीर्घकाळ वापर टाळावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
फक्त दोन घटकांची गरज
हे नैसर्गिक डाय तयार करण्यासाठी लागतात,
- २ चमचे कॉफी पावडर
- ४–५ चमचे मेंदी पावडर (हिना)
तयार करण्याची पद्धत
1. एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात कॉफी पावडर मिसळा आणि घट्ट पेस्ट तयार करा.
2. या मिश्रणात हिना पावडर घाला आणि नीट हलवा.
3. तयार पेस्टला १–२ तास झाकून ठेवा, जेणेकरून रंग व्यवस्थित तयार होईल.
4. पेस्ट जास्त पातळ नसावी, अन्यथा ती केसांवर टिकणार नाही.
वापरण्याची पद्धत
1. सर्वप्रथम केस स्वच्छ धुवा. कारण खराब केस रंग घेत नाहीत.
2. तयार डाय केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत समानपणे लावा.
3. साधारण १ तास ठेवा आणि नंतर हलका शॅम्पू वापरून केस धुवा.
या डायचे फायदे
- कॉफी केसांना नैसर्गिक ब्राऊन रंग देते.
- हिना केसांना पोषण देते, मजबूत करते आणि नैसर्गिक चमक आणते.
- यात कोणतेही केमिकल नसल्याने साइड इफेक्ट्स होत नाहीत.
The post natural hair dye: केमिकलला करा ‘बाय-बाय’; फक्त दोन नैसर्गिक घटकांपासून बनवा घरगुती हेअर डाय appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











