
Amravati Politics | आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांच्यात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यासोबत राजकीय संघर्ष होण्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.
युवा स्वाभिमान पार्टीच्या महाराष्ट्र कार्यकारिणी बैठकीत भाजपसोबत युती करण्याचा ठराव मंजूर झाला होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधामुळे आता पक्षाने स्वतंत्र लढाईची तयारी सुरू केली आहे. नवनीत राणा या भाजपच्या नेत्या असल्याने त्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करतील, तर रवी राणा आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, स्वबळाचा निर्णय एक दोन दिवसात आमदार रवी राणा हे स्वतः जाहीर करणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. या घडामोडींमुळे अमरावतीतील स्थानिक स्वराज्य निवडणुका अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
दिल्ली बॉम्बस्फोटात तुर्की कनेक्शन उघड ; उमर आणि मुझम्मिलचा प्रवास अन् टेलिग्राम ग्रुपशी संपर्क
The post अमरावतीच्या राजकारणात ट्विस्ट! नवनीत राणा पती रवी राणांविरोधात प्रचार करणार असल्याची चर्चा appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











