गायिका पलकच्या कार्याची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद; हजारो मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी केली मदत

Palak Muchhal |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Palak Muchhal | गायिका पलक मुच्छलने आपल्या सुंदर आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे. याशिवाय ती सामाजिक कार्यासाठी देखील ओळखली जाते. तिने हजारो गरजू बालकांच्या हृदयशस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत केली आहे. तिच्या या कार्याची आता ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे.

पलकने पलाश चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून ३,८०० हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही पलकने सेवा कार्य कधीच थांबवले नाही. बालपणी रेल्वे प्रवासादरम्यान, पलक काही गरीब मुलांना भेटली. त्या क्षणाने तिच्या आयुष्याला एक मोठे उद्दिष्ट दिले. त्या दिवशी तिने स्वतःला एक वचन दिले, “मी त्यांना कधीतरी नक्कीच मदत करेन.”

या संकल्पनेवर ठाम राहून पलकने आपल्या प्रत्येक संगीत कार्यक्रमातून मिळणारे मानधन थेट हृदयशस्त्रक्रियांसाठी वापरले. तिने फक्त मुलांच्या शस्त्रक्रियांसाठीच नव्हे, तर कारगिल शहीदांच्या कुटुंबांना मदत आणि गुजरात भूकंप पीडितांसाठी १० लाखांची देणगी दिली आहे.

‘मेरी आशिकी, कौन तुझे, प्रेम रतन धन पायो’ यांसारखी हिट गाणी देणाऱ्या या गायिकेने नेहमीच सांगितलं आहे की, “माझा आवाज केवळ संगीतासाठी नाही, तर जीवनासाठी आहे.” तिचे पती आणि संगीतकार मिथुन यांनीही या प्रवासात तिची साथ दिली आहे.

दरम्यान, पलकचं नाव आधीच ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदले गेले होते आणि आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश होऊन तिच्या कार्याचे कौतुक जागतिक स्तरावर होत आहे. तिच्या या कार्याचे आता सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

हेही वाचा: 

परवेझ अन्सारीच्या घरातून सहा मोबाईल, आंतरराष्ट्रीय सिम कार्ड जप्त ; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

The post गायिका पलकच्या कार्याची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद; हजारो मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी केली मदत appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!