
Actress Divya Dutta : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना जवळपास एका आठवड्यानंतर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धर्मेंद्र रुग्णालयातून त्यांच्या घरी आले असून, डॉक्टर आणि कुटुंबीयांनी पुष्टी केली आहे की ते आता घरीच उपचार सुरू ठेवतील.
गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीसंदर्भातील अनेक बातम्या समोर येत आहेत. सिनेकलाकार त्यांचे चाहते सर्वचजण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. अनेकांनी पोस्ट शेअर करत याविषयी प्रार्थना केली आहे. दरम्यान, अभिनेत्री दिव्या दत्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून अभिनेत्रीने काळजी व्यक्त केली आहे.
या व्हिडीओत अभिनेत्री मुंबईतील ट्रॅफिकमध्ये अडकली आहे आणि धर्मेंद्र यांचे ‘पल पल दिल के पास’ हे गाणे ऐकत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने धर्मेंद्र लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही करणारी पोस्ट लिहिली आहे. दिव्या दत्ताने तिच्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवरून शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “मुंबईचा आत्मा, गजबजलेले शहर. ट्रॅफिक जाम, एका बाजूला धावणारी वाहने आणि दुसऱ्या बाजूला ब्लॉक केलेला रस्ता. बॅडमिंटन खेळणारे तरुण, आई तिच्या मुलाला मिठी मारत आहे.” असे वर्णन तिने केले आहे. पुढे तिने लिहिले, “आणि मी? माझ्या स्वतःच्या विचारांनी थोडे दबले जात आहे. धरमजींचे गाणे रेडिओवर वाजत आहे. ते आणि मी पंजाबमधील एकाच शहरातील आहोत…” साहनेवाल. असे तिने म्हटले आहे.
त्यांचे चित्रपट आणि त्याने निर्माण केलेले बंध… आपल्या आयुष्यात… आपल्या बालपणात… ‘ही-मॅन’ कोरला गेला आहे. लवकर बरे व्हा धरमजी, तुम्ही अनमोल आहात.” असे म्हणत तिने धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल काळजी वाटणारी पोस्ट लिहिली आहे.
हेही वाचा : परवेझ अन्सारीच्या घरातून सहा मोबाईल, आंतरराष्ट्रीय सिम कार्ड जप्त ; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
The post “ते आणि मी पंजाबमधील…”; अभिनेत्री दिव्या दत्ताचा व्हिडीओ व्हायरल, धर्मेंद्र यांच्याबद्दल काळजी वाटणारी पोस्ट केली शेअर appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











