
Movie Rockstar Completes 14 Years: बॉलीवूडचा सुपरहिट आणि कल्ट मानला जाणारा चित्रपट ‘रॉकस्टार’ आज आपल्या प्रदर्शानाला १४ वर्षे पूर्ण करत आहे. रणबीर कपूर आणि नरगिस फाखरी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने अभिनय, संगीत आणि कथानक या सर्व बाबतीत प्रेक्षकांच्या मनावर अमीट ठसा उमटवला होता.
नरगिस फाखरीच्या आठवणी
या खास प्रसंगी अभिनेत्री नरगिस फाखरी हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर रणबीर कपूरसोबतच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटातील काही जुने फोटो पोस्ट केले आहेत.
ती कॅप्शनमध्ये लिहिते,
“काही चित्रपट केवळ कथा सांगत नाहीत, तर ते चित्रासारखे कायम मनात कोरले जातात.”
फॅन्सनी तिच्या या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला असून कमेंट्समध्ये ‘रॉकस्टार’च्या आठवणींनी सगळे भावूक झाले आहेत.
इम्तियाज अलींची प्रतिक्रिया
चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनीदेखील या विशेष दिवशी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांनी शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ रीपोस्ट केले. या फोटोंमध्ये आणि व्हिडिओंमध्ये ‘रॉकस्टार’च्या शूटिंगदरम्यानच्या अनेक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
इम्तियाज अलींनी आजवर अनेक लोकप्रिय चित्रपट दिले असले, तरी ‘रॉकस्टार’ हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक प्रभावी आणि भावनिक चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने संगीत, संवाद आणि पात्रांच्या भावनांमधून प्रेक्षकांना नव्या प्रकारे जोडले.
अजूनही चाहत्यांच्या मनात जिवंत
‘रॉकस्टार’चा संगीतकार ए. आर. रहमान आणि गायक मोहित चौहान यांच्या स्वरांनी या चित्रपटाला अविस्मरणीय बनवलं. “सड्डा हक”, “नादान परिंदे”, “कुन फाया कुन” यांसारखी गाणी आजही चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहेत.
‘रॉकस्टार’ फक्त एक चित्रपट नव्हता, तर भावनांचा प्रवास होता. १४ वर्षांनंतरही रणबीर कपूर आणि नरगिस फाखरी यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात तसाच ताजा आहे.
The post Movie Rockstar Completes 14 Years: रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटाला १४ वर्षे पूर्ण; नरगिस फाखरी आणि दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी शेअर केल्या जुन्या आठवणी appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











