Pune : आरक्षण जाहीर, आता तिकीटासाठी प्रयत्न

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

येरवडा  – पुणे महापालिकेच्या निवडणूक आरक्षण सोडतीनंतर प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात कोण लढणार, हे स्पष्ट झाले ज्या ठिकाणी महिला आरक्षण पडले आहे अशा ठिकाणी अनेकांकडून आपल्या कुटुंंबातील महिलांची नावे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात सुरूवातही केली आहे.

आहे. मागील चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणूका घेण्याचे आदेश देत त्याचा कालबध्द कार्यक्रमही जाहीर झाला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये प्रभाग क्र. २ फुलेनगर-नागपूरचाळ या प्रभागात अनुसूचित जाती (महिला) आरक्षण पडले आहे. तर, ओबीसी महिला आणि ओबीसी सर्वसाधारण आणि एक खुला गट आहे. मागील वेळी अनुसुचित जाती (खुला) गट असलेल्या या प्रभागातून माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांनी निवडणूक जिंकली होती.

यावेळी महिला आरक्षण पडल्याने या प्रभागातून महिला उमेदवार दिला जाणार असल्याने आता या गटातून संभाव्य असलेल्या उमेदवारांची अडचण झाली असून आता त्यांना घरातील महिला उमेदवाराला निवडणुकीसाठी संधी द्यावी लागणार आहे. काही उमेदवारांनी याची सुरूवात केली असून संभाव्य इच्छुक उमेदवारांनी लगेच सोशल मीडियावर कुटुंबातील महिला उमेदवाराची उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

प्रभागातील व्हाॅटसअप ग्रुपवर याची सुरुवात झाली आहे, त्यामुळे आगामी निवडणूक ही चुरशीची होणार असल्याची चर्चा प्रभागात रंगू लागली आहे. सध्या, आरक्षण सोडत जाहीर होऊन निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी उमेदवारांची खरी लढाई आता पक्षाकडून उमेदवारी मिळवताना होणार आहे. एकाच पक्षाकडून अनेकजण इच्छुक असल्याने आता उमेदवारीसाठी जोर लावावा लागणार आहे

The post Pune : आरक्षण जाहीर, आता तिकीटासाठी प्रयत्न appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!