Pune : मुंढवा-केशवनगर मोठे फेरबदल; प्रभाग क्र. १४ आणि १५ मध्ये आरक्षणाची स्थिती

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंढवा – पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. यामध्ये प्रभाग क्र. १४ आणि क्र. प्रभाग क्र १५ मध्ये आरक्षण सोडतेनंतर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त दिसत आहे. मुख्यत्वे करून अनुसूचित जाती प्रवर्गातून मोठ्या प्रमाणात पुरुष इच्छुक उमेदवार होते. अनेकांनी वर्षानुवर्षे विविध सामाजिक उपक्रम राबविले होते.

या प्रवर्गात दोन्ही प्रभागात पुरुष इच्छुक उमेदवारांनी जय्यत तयारीत होते. परंतु, येथील आरक्षण अनुसूचित जाती महिला असे पडल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, यातुनही मार्ग काढीत अनेकांनी आपल्या कुटुंबातील महिला उमेदवारांना रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.

तसेच, याच प्रभांत ओबीसी आरक्षण पडणार असे अंदाज बांधत अनेकांनी तयारी केली होती, यामध्ये महिला ओबीसी उमेदवारांनी मोठी तयारी केली होती मात्र आरक्षण बदल्याने या प्रवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रभाग क्र. प्रभाग क्र १४ अ : अनुसूचित जाती : महिला, प्रभाग क्र १४ ब : नागरिकांचा ओबीसी मागास प्रवर्ग : पुरुष, प्रभाग क्र १४ क : सर्वसाधारण प्रवर्ग : महिला, प्रभाग क्र १४ ड : सर्वसाधारण प्रवर्ग : पुरुष. प्रभाग क्र १५ अ : अनुसूचित जाती : महिला, प्रभाग क्र १५ ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग : पुरुष, प्रभाग क्र १५ क : सर्वसाधारण प्रवर्ग : महिला, प्रभाग क्र १५ ड : सर्वसाधारण प्रवर्ग : पुरुष अशी सोडत आज जाहीर झाली आहे.

या दोन्ही प्रभागातून नागरिकांचा मागास प्रवर्गातून मोठ्या प्रमाणात महिला इच्छुक होत्या. आता, मीच नगरसेविका होणार, अशी जाहिरातबाजी अनेकांनी केली होती. परंतु, या दोन्ही प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग : पुरुष आरक्षण पडले आहे. त्यामुळे इच्छुक ओबीस महिला उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात शांतता आहे. कुठेही आता प्रभागात कुजबुज नाही. अनेकांचा पत्ताच कट झाल्याचे बोलले जात आहे. ओबीसीतून इच्छुक महिलांना आता सर्वसाधारण प्रवर्ग : महिला यातून उभे रहावे लागेल. यातही तिकिटासाठी मोठी स्पर्धा असणार आहे.

कुठे उभे रहावे, हेच समजेना…

प्रभाग क्र. १४ व प्रभाग क्र. १५ मध्ये अनेक राजकीय गणिते बदलणार आहेत. अनेक ठिकाणी मनाविरुद्ध आरक्षण पडल्याचे समोर येत आहे. अभ्यास केला एका पेपरचा आणि पेपर आला वेगळ्याच विषयाचा, अशी गत आता या प्रभागात काही ठिकाणी झाली आहे. इतक्या वर्षांनी निवडणुका होत आहेत.

तर काही ठिकाणी प्रथमच निवडणुका होत असल्याने अनेक इच्छुकांनी चार-पाच वर्षात मोठा खर्च केला आहे. त्यात आरक्षणामुळे सर्व गणिते बदलली असल्याने कुठे उभे रहावे, हेच समजेनासे झाले आहे. या निवडणुकीत सगळ्याच उमेदवारांचा कस लागणार आहे. कारण, यावेळच्या निकालातही थोड्याफार मतांच्या फरकाने विजयाचा गुलाल लागणार, असे काही राजकीय तज्ञ सांगत आहेत. आता स्पर्धा ही तिकीटांचीच होणार हे मात्र नक्की.

The post Pune : मुंढवा-केशवनगर मोठे फेरबदल; प्रभाग क्र. १४ आणि १५ मध्ये आरक्षणाची स्थिती appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!