Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदलणार चित्र; आरक्षण जाहीर

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले असून मोठ्या प्रमाणात झालेल्‍या बदलांमुळे महापालिकेचे चित्र देखील बदलण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडत प्रक्रिया मंगळवारी (दि. ११) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संपन्न झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने या आरक्षण सोडतीच्या कामासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे प्राधिकृत अधिकारी म्हणून होते.

३२ प्रभागांपैकी २० प्रभागांमध्ये अनुसुचित जातीसाठी जागा निश्‍चित करण्यात आल्या. त्यानंतर पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांसाठी राखीव असणाऱ्या जागांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यामध्ये २० जागांपैकी १० जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या.

त्यामध्ये प्रभाग क्रमांक ३१, ४, १९, ३२, १७, २३, १०, २१, ३, २९ या मध्ये अनुसुचित जाती (एससी ) जागांसाठी महिलांचे आरक्षण आहे. तर अनुसचित जमाती (एसटी) साठी लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार ३ प्रभाग निश्‍चित करण्यात आले. नियमानुसार २ प्रभागामध्ये महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक २९ आणि ३० या दोन प्रभागांमध्ये महिलांसाठी जागा राखीव आहे.

तिसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) सोडत प्रक्रिया पार पडली. शहरातील ३२ प्रभागांत थेट जागा निश्‍चित करण्यात आल्या. तर उर्वरित दोन जागांसाठी सोडत काढत प्रभाग ५ आणि ६ मध्ये ओबीसीसाठी जागा राखीव करण्यात आली. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी प्रभाग ५, ६, ८, ९, ११, १३, १६, २०, २५, २६, २७, २, १८, २२, १०, ४, १९ या १७ जागा आरक्षित झाल्या.


सर्वसाधारण महिलांसाठी ३५ जागा
चार सदस्यीय प्रभागामध्ये दोन पेक्षा जास्त महिला येणार नाही याचा विचार करून सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार, एकूण ३५ प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिलांचे आरक्षण आहे.

 

The post Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदलणार चित्र; आरक्षण जाहीर appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!