
वारजे – वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. २९ आणि ३० मध्ये आरक्षण सोडत मागील वेळी प्रमाणेच पडले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या प्रभाग क्र. ३२ मध्ये एक अनुसुचीत जाती महिला (एससी) आरक्षण पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची घडी विस्कटली असून, आता एससी महिला उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. तसेच प्रभाग क्र. ३३ हा समाविष्ट गावातील असून, या प्रभागात उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.
प्रभाग क्र. २९ डेक्कन जिमखाना-हॅपी काॅलनी आणि प्रभाग क्र. ३० कर्वेनगर हिंगणे होम काॅलनी या दोन्ही प्रभागात दोन सर्वसाधारण महिला, एक सर्वसाधारण पुरूष आणि एक ओबीसी पुरूष असे आरक्षण पडले आहे. प्रभाग क्र. २९ मध्ये भाजपचे वर्चस्व असून, यावेळी याठिकाणी उमेदवारी बदलाची चर्चा सुरू झाल्यामुळे इच्छुकांनी गर्दी करत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरणार की, उमेदवारी बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्र. ३० मध्ये तीन भाजपचे आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे याठिकाणीही इच्छुकांची गर्दी वाढली आहे.
प्रभाग क्र. ३२ वारजे-पाॅप्युपलर नगरमध्ये एक अनुसुचीत जाती महिला (एससी), सर्वसाधारण महिला, एक ओबिसी पुरूष, एक सर्वसाधारण पुरूष, असे आरक्षण पडले आहे. यावेळी महिला एससी आरक्षण पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या उमेदवारांना धक्का बसला आहे. चारपैकी तीन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील असल्यामुळे भाजपला या ठिकाणी संधी मिळणार का? मिळवणार असा प्रश्न उपस्थित होतो.
प्रभाग क्र. ३३ शिवणे-खडकवासला-धायरी यामध्ये समाविष्ट गावांचा समावेश असून, दोन सर्वसाधारण पुरूष, सर्वसाधारण महिला आणि ओबीसी महिला असे आरक्षण पडले आहे. येथील इच्छुक उमेदवार पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणुक लढविणार असून, त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीसह ग्रामपंचायतीमधील इच्छुकांची मोठी गर्दी आहे. आता या प्रभागावर भाजप बाजी मारणार की राष्ट्रवादी हे उमेदवारी जाहीर झाल्यावर जवळपास स्पष्ट होईल.
The post Pune : राष्ट्रवादी काँग्रेसची घडी विस्कटणार appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











