Pimpri: निवडणुकांपूर्वी पोलिसांकडून प्रतिबंधात्‍मक कारवायांना सुरुवात; तीन गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पिंपरी – एमआयडीसी भोसरी, चाकण आणि काळेवाडी परिसरातील तीन कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांना सुरुवात केली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला असलेला प्रीतम उर्फ शुभम राहुल राठोड (वय २३, रा. कुदळेवस्ती, मोशी) हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर जबरी चोरी, अवैधरित्या दारू विक्री करण्याचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. सध्या तो नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत.

चाकण परिसरातील अट्टल गुन्हेगार महेश बबन कड (वय ३२, रा. कडाचीवाडी, चाकण) याच्या विरोधात खून, खंडणी मागणे, मारामारी असे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. तर काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार सौरभ विकास साठे (वय २२, रा. रहाटणी) याच्यावर देखील खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणी मागणे, तडीपारीच्या आदेशाचा भंग करणे, पिस्तूल आणि इतर हत्यारे जवळ बाळगणे असे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो अमरावती मध्यवर्ती कारागृहात आहे.

स्थानिक पोलिसांनी तीनही आरोपींच्या विरोधात स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तीनही आरोपींना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यंदाच्‍या वर्षात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २५ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने सुरु आहेत. या कारवायामुळे भविष्यातील गुन्हेगारी नियंत्रणात येणार आहे.  डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड

The post Pimpri: निवडणुकांपूर्वी पोलिसांकडून प्रतिबंधात्‍मक कारवायांना सुरुवात; तीन गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!