मंत्री छगन भुजबळांच्याच जिल्ह्यात रेशनच्या तांदळाचा काळा बाजार उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

सुरगाणा (नाशिक): सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत गरिबांसाठी असलेल्या धान्याचा काळाबाजार नाशिक जिल्ह्यात, खुद्द अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यातच पुन्हा एकदा उघड झाला आहे. या रॅकेटचे गुजरात कनेक्शन असल्याचेही स्पष्ट झाले आहे. रेशन दुकानदारांवर वारंवार कारवाईचा कोणताही परिणाम होत नसल्याचे या घटनेतून दिसून येते.

सुरगाणा शहरात तहसीलदार रामजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत ट्रकसह शेकडो क्विंटल धान्य जप्त केले. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आदिवासी व गरीब जनतेसाठी असलेले हे धान्य रेशन दुकानदारांच्या माध्यमातून गुजरातमध्ये काळ्या बाजारात विकले जात होते. यापूर्वीही अशा कारवाया झाल्या आहेत.

सोमवारी करण्यात आलेल्या या धाडीत काळ्या बाजारात विक्रीसाठी तयार असलेले धान्य जप्त करण्यात आले. सुमारे ८.९४ लाखांचा माल यात जप्त करण्यात आला असून, हे धान्य जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत बेकायदेशीररीत्या साठवल्याचा प्राथमिक संशय आहे.

तहसीलदार राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सुरगाणा–उंबरठाण रोडलगत मोतीबाग परिसरात आयशर ट्रक (एमएच. १५ जेसी ६०९६) मध्ये मोठ्या प्रमाणावर धान्य साठवून ठेवले होते. पुरवठा निरीक्षक बी. एस. बाघ यांच्या पथकाने त्वरीत तपास करत ट्रक क्रमांक एमएच १५ जेएच ५६३१ सह धान्य जप्त केले.

तहसीलदार रामजी राठोड यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया दिली की, “गरीब जनतेसाठी असलेले रेशन धान्य कोणीही काळ्या बाजारात विकू शकत नाही. अशा गुन्ह्यांवर ‘शून्य सहनशीलता’ (Zero Tolerance) ठेवली जाईल आणि दोषींना कठोर शिक्षा केली जाईल.” या कारवाईमुळे आदिवासींच्या तोंडातील घास हिरावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

The post मंत्री छगन भुजबळांच्याच जिल्ह्यात रेशनच्या तांदळाचा काळा बाजार उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!