
Karuna Munde : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात वेगवान घडामोडी घडत असून, राजकीय भवितव्य पाहून नेत्यांकडून निर्णय घेतला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिला टप्प्यातील मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. ही निवडणूक राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी घेतली जाणार आहे. या सगळ्यात आता एक मोठी घडामोड घडली आहे.
करुणा मुंडे यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी करुणा मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन स्वराज्य शक्ती पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, या घोषणेनंतर मुंडे थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भेटीनंतर करुणा मुंडेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याची माहिती दिली आहे.
या भेटीत करुणा मुंडे यांनी संपदा मुंडे हत्या प्रकरणावर चर्चा केली. तसेच महादेव मुंडे हत्या प्रकरणासाठी लावण्यात आलेल्या एसआयटीच्या चौकशीचा तपास याबद्दल चर्चा केली असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. येणाऱ्या निवडणुकीसाठी युतीच्या संदर्भात बोलणे झाले आहे. यामुळे महाविकास आघाडीसोबत करुणा मुंडे यांचा पक्ष जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यावर बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, नगरपालिका इलेक्शनसाठी ताईने सांगितले सगळे स्वतंत्र लढत आहोत जिथे तुम्हाला असे वाटते जिथे सपोर्ट द्यायचे आहे, तिथे तुम्ही द्या जिथे तुम्हाला वाटते इथे सपोर्ट घ्यायचा आहे. तिथे आम्ही तुम्हाला देऊ, असे आश्वासन सुप्रिया सुळेंनी दिल्याचे करुणा मुंडेंनी सांगितले. संपदा मु्ंडे हत्या प्रकरण शांत झाले. ताईला विनंती केली संपदा मुंडेंना न्याय मेळत नाही तोपर्यंत शांत बसू नका, शेतकऱ्यांना अनुदान मिळालेल्या नाही. यावरही चर्चा झाल्याचे करुणा मुंडेंनी सांगितले.
हेही वाचा : पाकिस्तानातील इस्लामाबाद उच्च न्यायालयाजवळ बॉम्ब स्फोट ; ५ जणांचा मृत्यू, २५ जण जखमी
The post चर्चांना उधाण! करुणा मुंडेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट; लवकरच मोठा निर्णय? पहिली प्रतिक्रिया देत म्हणाल्या… appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











