कोल्हापूर शहरातील विवेकानंद परिसरात बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यवस्तीतील या भागात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली. या बिबट्याने काही स्थानिकांवर आणि नंतर एका पोलीस कर्मचाऱ्यावरही हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली.
वनविभागाचे पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्या एका चेंबरमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी आणि पकडण्यासाठी विशेष सापळा रचण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











