
एका महिला सफाईकर्मीने आपल्या धैर्याने रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या एका तरुणाला चांगलाच धडा शिकवला आहे. सोमवारी पहाटे ही घटना घडली. 50 वर्षीय महिला सफाईकर्मी आपल्या ड्यूटीवर होती आणि एका बाइकस्वार तरुणाने तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. महिलेने लगेच आपल्या हातातील झाडू उचलला आणि तरुणावर हल्ला केला, त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला.
नेमकं काय घडलं?
माहितीनुसार, ही घटना तामिळनाडूतील चेन्नईयेथील अडयार पूलाजवळ ही घटना घडली. सोमवारी सकाळी साधारण 5 वाजता महिला रस्त्याची सफाई करत होती, तेव्हा हेल्मेट घातलेला एक तरुण आपली बाइक घेऊन तिच्यासमोर येऊन थांबला. महिलेने त्याला बाइक हटवण्यास सांगितले जेणेकरून सफाई होऊ शकेल, तेव्हा तरुणाने प्रथम विचित्र पद्धतीने डोके हलवले आणि नंतर अचानक आपल्या पँटची झिप उघडून अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
महिलेनी केली तक्रार
महिला सफाईकर्मीने पोलिसात जाऊन तक्रार केली. तिने सांगितले की, ‘सुरुवातीला वाटले की तो कदाचित कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि मजा करत आहे, पण जेव्हा त्याने झिप उघडली, तेव्हा मी थक्क झाले. मी लगेच झाडू उचलला आणि त्याला मारायला सुरुवात केली. तो घाबरून बाइकवर बसला आणि पळून गेला.’ ही संपूर्ण घटना एका कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की महिला आपल्या बचावात धैर्याने प्रतिक्रिया देत आरोपीला हाकलून देते. हे फुटेज पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
महिला सफाईकर्मीने सांगितले की ही पहिली वेळ नाही जेव्हा तिच्याशी असे घडले आहे. तिने म्हटले, ‘आम्ही सफाईकर्मी सकाळी-सकाळी एकटे काम करतो तेव्हा अनेकदा लोक नशेत किंवा अश्लील कृत करण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला सुरक्षेची गरज आहे. प्रशासनाने आमच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करावी.’ पोलिसांनी सांगितले की आरोपीची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच त्याला लवकरच अटक करण्यात येईल. या घटनेने चेन्नईमध्ये महिला सफाईकर्मींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











