
पुणे : कर्वेनगर वारजे भागातील आनंदीबाई कर्वे प्रतिष्ठान तसेच रेश्मा संतोष बराटे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्रीडा क्षेत्रांतील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन उपाध्यक्ष मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात राष्ट्रीय, राज्यस्तरीय क्रीडा प्रकाराचे तायक्वांदो लॉन टेनिस हँडबॉल कबड्डीपट्टू धावपटू कुस्ती आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते व त्यांना प्रशिक्षित करणाऱ्या प्रशिक्षक यांना सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी त्यांना गौरविण्यात आले आहे.
या सन्मान सोहळ्यासाठी पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे बंधू प्रभाकर मोहोळ उपस्थित होते. या सोहळ्यात खेळाडूंनी सहभागी होऊन आपल्या कर्वेनगर वारजे भागाचे नाव देशात आणि संपूर्ण जगात गाजवावे, असे आवाहनही कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर मोहोळ यांच्यावतीने करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजयजी पारगे वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तायक्वांदो लाला भिलारे क्रीडा अधिकारी संदीप वांजळे कुस्ती प्रशिक्षक गोरख वांजळे, संजय दाभाडे राष्ट्रीय प्रशिक्षक लॉन टेनिस रोहित शिंदे तसेच हँडबॉल प्रशिक्षक शिवानी गरुड कबड्डी प्रशिक्षक पियूष हनवंते व सुयश जोशी, संजय मरळ यांनी खेळाडूंचा सन्मान केला. याप्रसंगी संतोष दत्तोबा बराटे व रेश्मा संतोष बराटे यांच्या वतीने खेळाडूंचे स्वागत करण्यात आहे.
The post Pune : मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा क्षेत्रांतील खेळाडूंचा सन्मान appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











