प्रवक्ते पदावरून हटवलं, रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादी सोडणार? चर्चांना उधान; ‘या’ दोन पक्षांच्या अॅाफर मिळाल्याची चर्चा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Rupali Patil Thombre : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अवघा महिना शिल्लक असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नुकत्याच जाहीर केलेल्या १७ प्रवक्त्यांच्या यादीतून पक्षाच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांना वगळ्यात आले आहे. यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. अशातच  रुपाली पाटील ठोंबरे नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रवक्त्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची देखील गच्छंती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात अंतर्गत वाद असल्याची चर्चा आहे. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर पक्षातील रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली होती. पक्षातून सात दिवसांचा अवधी देऊन नोटीस बजावण्यात आली होती. पण त्याअगोदरच त्यांची पक्षाच्या प्रवक्ते पदावरून गच्छंती करण्यात आली.

अॅाफर मिळाल्याची चर्चा

रुपाली पाटील ठोंबरे यांची पक्षाच्या महत्वाच्या पदावर हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्या नाराज झाल्या असून पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांना दोन पक्षांच्या अॅाफरही मिळाल्याची चर्चा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून ठोंबरे पाटील यांना अॅाफर दिल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे शिंदे सेनेकडूनही त्यांना पक्षाची अॅाफर मिळाली असल्याची चर्चा आहे.

हे ही खरं असले तरी…

प्रवक्त्या पदावरून हटवल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी काही लोक स्वतःहून मला पक्षामध्ये येण्याची ऑफर देत असल्याचे सांगितले होते. पुढे त्या म्हणाल्या, हे ही खरं असलं तरी सध्या माझा पक्ष सोडण्याचा विचार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी एका न्यूज चॅनेलशी बोलताना केले होते. त्यामुळे आता त्या कोणता मोठा निर्णय घेणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचा : Health Tips: थंडी सुरू होताच घशात दुखतंय? ‘हे’ घरगुती उपाय टॉन्सिल्सची समस्या मुळापासून दूर करतील

The post प्रवक्ते पदावरून हटवलं, रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादी सोडणार? चर्चांना उधान; ‘या’ दोन पक्षांच्या अॅाफर मिळाल्याची चर्चा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!