
प्रभात वृत्तसेवा
पुणे – बाणेर भागात शेतात अनधिकृतपणे सुरू असलेल्या हुक्का बारवर पोलिसांनी कारवाई केली. ‘फार्म कॅफे’ असे या बारचे नाव आहे. याप्रकरणी ‘फार्म कॅफे’ पोलिसांनी जागा मालक, कॅफेचा चालक, मॅनेजर तसेच वेटर अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ४८ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.कॅफे मालक अमित वाळके (रा. औंध),
मॅनेजर बलभीम कोळी, चालक विक्रम कुमार द्वारकाप्रसाद गुप्ता (२३), हुक्का भरणारा वेटर सूरज संजय वर्मा(२४) आणि राजकुमार चन्नू अहिरवाल (वय १९, सर्व रा. औंध-बाणेर लिंक रोड, बाणेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार वाघेश भीमराव कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ नोव्हेंबर रोजी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ आयोजित करण्यात आले होते. तेव्हा तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाणेर भागात बेकायदेशीर हुक्का बार सुरू असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी औंध-बाणेर लिंक रोडवरील सर्व्हे क्रमांक २२४ येथील ‘फार्म कॅफे’वर छापा टाकला. या कॅफेमध्ये ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरीत्या तंबाखूजन्य हुक्का पुरवला जात असल्याचे पोलिसांना आढळून आले.
दरम्यान, बेकायदेशीरपणे हुक्का बार चालवताना आढळल्याने एकूण पाच आरोपींविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये जागा मालक, व्यवस्थापक (मॅनेजर) आणि कामगार यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ४८ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये २० काचेचे हुक्का पॉट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे हे करत आहेत.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे, निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आश्विनी ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, वाघेश कांबळे, तुषार गिरंगे यांनी ही कामगिरी केली.
The post शेतात हुक्का बार! बाणेरमधील ‘फार्म कॅफे’वर पोलिसांचा छापा; मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











