Pune News : सायकल स्पर्धेच्या रस्त्यांसाठी १३६ कोटी ; पालिकेने प्रथमच एका कामासाठी तब्बल ३३८ कामांचा निधी वळवला

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे : जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुणे द ग्रॅण्ड टूर सायकल स्पर्धेसाठी महापालिका शहरातील ७५ किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करणार आहेत. यासाठी १३६ कोटी खर्च होणार असून, हा निधी उपलब्ध करण्यासाठी पालिकेने तब्बल ३३८ विकासकामांचा निधी वळवला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पथ विभागाने वर्गीकरणाद्वारे हा निधी वळविला आहे.

या कामांमध्ये रस्ते बांधकाम, दुरुस्ती, मिसिंग लिंक रस्ते, पदपथ दुरुस्ती आणि रस्त्यांसाठीचे भूसंपादन अशा शहरातील तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील कामांचा समावेश आहे. प्रत्येक कामासाठी अंदाजपत्रकात प्रस्तावित निधीतून ५ ते २० टक्क्यांपर्यंतचा निधी वळविण्यात आला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका कामासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध कामांचा निधी वळविला आहे.

जानेवारीत होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या हद्दीत मिळून सुमारे साडेचारशे किलोमीटरचा ट्रॅक असेल. स्पर्धेत ५० देशांतील २०० पेक्षा अधिक सायकलपटू सहभागी होणार आहेत. त्यापैकी सुमारे ७५ किलोमीटरचा भाग पुणे शहराच्या हद्दीत येतो. या मार्गावरील रस्ते आंतरराष्ट्रीय मानांकनांप्रमाणे विकसित करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. त्यासाठी प्रती किलोमीटर सुमारे साडेतीन कोटी रुपयांची कामे होणार आहेत.

ही स्पर्धा अचानक जाहीर झाल्याने महापालिकेच्या अंदाजपत्रकात यासाठी निधीची तरतूद नव्हती. एवढा मोठा खर्च उभारणे शक्य नसल्याने सुरुवातीला पालिकेने शासनाकडे निधी मागण्याची तयारी केली होती. मात्र, स्पर्धेला आता कमी वेळ शिल्लक असल्याने प्रशासनाने शासनाच्या निधीची वाट न पाहता दोन आठवड्यांपूर्वीच चार पॅकेजमधून ही कामे करण्यास मंजुरी दिली. या मंजुरीवेळीही निधीची तरतूद नव्हती. शेवटी पथ विभागाच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित ३३८ विकासकामांच्या तरतूदींमधून एकूण १३६ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे.

या कामांचा निधी वळविला
मिसिंग लिंक रस्ते , रस्त्यांसाठी भूसंपादन, डांबरीकरण, चेंबर समपातळी, रस्ते काॅक्रीटीकरण, नवीन रस्ते विकसन , डांबर खरेदी, कल्वर्ट बांधकाम, खड्डे दुरूस्ती, रस्त्यांची देखभाल दुरूस्ती, पदपथ विकसन, पदपथ दुरूस्ती, रस्ता रूंदीकरणासाठी भूसंपादन, डीपी रस्ते विकसन

The post Pune News : सायकल स्पर्धेच्या रस्त्यांसाठी १३६ कोटी ; पालिकेने प्रथमच एका कामासाठी तब्बल ३३८ कामांचा निधी वळवला appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!