पीएमपीएमएलमध्ये घोटाळा! दोन मार्केटिंग एक्झिक्युटिव्हनी केली संस्थेची दिशाभूल; गुन्हा दाखल

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएमएल) करारावर नियुक्त दोन मार्केटिंग एक्झिक्युटिव्हनी संस्थेची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएमपीएमएलचे विधी अधिकारी ज्ञानोबा दिगंबर जाधव (५५, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी ज्ञानोबा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजन मधुकर लिंगायत (रा. धनकवडी, पुणे) आणि गौरव कुलकर्णी (रा. कोथरूड, पुणे) यांना सन २०२४ मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदावर करार पद्धतीने मानधनावर नियुक्त करण्यात आले होते.

त्यांना ‘कार्गो एफएल’, ‘पेयु डॅशबोर्ड’, ‘मोबाईल ॲप रेव्हेन्यू सिस्टीम’ आदी सॉफ्टवेअर प्रकल्पांची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली क्यूआर कोड तिकीट सुविधा योग्यरीत्या कार्यरत नसल्याने संस्थेच्या उत्पन्नात घट झाली. तपासात असे निष्पन्न झाले, की दोघांना संबंधित तांत्रिक कामाचा आवश्यक अनुभव नसून त्यांनी महामंडळाची दिशाभूल केली, तरीदेखील त्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे मानधन घेतले, असा आरोप करण्यात आला आहे.

महामंडळाच्या सॉफ्टवेअर सिस्टीमचे पासवर्ड आणि डाटा माहिती असतानाही, संबंधितांनी अधिकृत मेल व वेबसाईटचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय त्यांना देण्यात आलेले लॅपटॉप, टॅब, संगणक व पेनड्राइव्ह परत न केल्याची नोंद आहे. त्यामुळे भविष्यात या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात दोन्ही कर्मचाऱ्यांचा करार रद्द करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू आहे.

The post पीएमपीएमएलमध्ये घोटाळा! दोन मार्केटिंग एक्झिक्युटिव्हनी केली संस्थेची दिशाभूल; गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!