
प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – महापालिकेने शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी महापालिकेला केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या अर्बन मोबिलिटी परिषदेत केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू, भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव श्रीनिवास कटिकिथला, विशेष कार्यकारी अधिकारी जयदीप यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनिल पवार तसेच आयटीडीपी इंडिया संस्थेचे प्रांजल कुलकर्णी आणि आशिक जैन यांनी हा सन्मान स्वीकारला.
सर्वाधिक नाविन्यपूर्ण वित्तीय यंत्रणा असलेले शहर या श्रेणीत हा पुरस्कार महापालिकेला प्राप्त झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने देशातील पहिले ग्रीन बॉण्ड जारी करून गैरमोटारीकृत वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. महापालिकेने ग्रीन बॉण्डद्वारे २०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला असून, या निधीतून हरित सेतू प्रकल्प आणि टेल्को रोड पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे नागरिकांना सुरक्षित व सावली असलेले पादचारी मार्ग, सुरक्षित सायकल मार्ग, सुरक्षित शाळा क्षेत्रे, सायकल पार्किंग, वृक्षलागवड, पावसाच्या पाण्याने परिसरात जमिनीतील पाणी पुनर्भरण आणि मार्गदर्शक फलकासह रस्ते फर्निचर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. हरित सेतू उपक्रमांतर्गत निगडी प्राधिकरण परिसरातील १७ किलोमीटर रस्त्यांवर विकासकामे सुरू करण्यात आली आहेत.
“पिंपरी चिंचवड महापालिकेने शाश्वत शहरी वाहतुकीसाठी वित्तीय स्वावलंबनाचा अभिनव मार्ग अवलंबला आहे. ग्रीन बॉण्डमुळे प्रकल्पांसाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध झाला आणि विकासाच्या गतीत मोठी वाढ झाली. हा पुरस्कार म्हणजे आपल्या प्रयत्नांना मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील मान्यता आहे. हा सन्मान नागरिकांच्या सहभागानेच शक्य झाला.”
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
The post पिंपरी-चिंचवडचा दिल्लीत डंका! महापालिकेला केंद्र सरकारचा ‘शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











