‘खाकी’ वर्दीतील ‘नटवरलाल’! पोलीस अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करणारा गजाआड

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
भिगवण – पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून त्यांची फसवणूक करणार्‍या सराईत गुन्हेगाराला भिगवण पोलिसांनी जेरबंद केले आहे.गणेश शिवाजी कारंडे (वय 43, रा. श्रीपूर, ता. माळशिरस) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीने स्वतःचे नाव बदलून ‘संग्राम पाटील’ व ‘पृथ्वीराज पाटील’ या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खोटे अकाउंट तयार केले होते.

पोलीस अधिकार्‍यांचे फोटो वापरून स्वतःला पोलीस असल्याचा भास निर्माण करून महिलांशी विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फेसबुकद्वारे एका महिलेशी ओळख वाढवून ब्युटी पार्लरसाठी 6 लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यानंतर ‘माझ्या बायकोची बहीण’ म्हणून सही करावी लागेल असे सांगून पीडितेला मौजे मदनवाडी (ता. इंदापूर) येथील लॉजमध्ये बोलावले.

तेथे तिला दमदाटी करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि सोन्याचे दागिने, सहा हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 73 हजार रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 64, 303(2), 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध ठिकाणी अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे हे करीत आहेत.

The post ‘खाकी’ वर्दीतील ‘नटवरलाल’! पोलीस अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करणारा गजाआड appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!