
पुणे : बाणेर भागात शेतात अनधिकृतपणे सुरू असलेल्या हुक्का बारवर पोलिसांनी कारवाई केली. ‘फार्म कॅफे’ असे या बारचे नाव आहे. याप्रकरणी ‘फार्म कॅफे’ पोलिसांनी जागा मालक, कॅफेचा चालक, मॅनेजर तसेच वेटर अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ४८ हजार ६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कॅफे मालक अमित वाळके (रा. औंध), मॅनेजर बलभीम कोळी, चालक विक्रम कुमार व्दारकाप्रसाद गुप्ता (वय २३), हुक्का भरणारा वेटर सुरज संजय वर्मा (वय २४) आणि राजकुमार चन्नु अहिरवाल (वय १९, सर्व रा. औंध-बाणेर लिंक रोड, बाणेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार वाघेश भीमराव कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून ४८ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये २० काचेचे हुक्का पॉट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे हे करत आहेत.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे, निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आश्विनी ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, वाघेश कांबळे, तुषार गिरंगे यांनी ही कामगिरी केली.
The post Pune News : बाणेर येथे शेतात सुरू असलेल्या अनधिकृत हुक्का बारवर पोलिसांची कारवाई appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











