
Delhi Red Fort Blast : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला येथील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ आज सायंकाळी ६:५५ च्या सुमारास उभ्या असलेल्या एका इको व्हॅनमध्ये झालेल्या हाय इंटेंसिटी स्फोटामुळे (High Intensity Blast) प्रचंड हाहाकार माजला आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे, तर २४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अश्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट :
आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला.
Condolences to those who have lost their loved ones in the blast in Delhi earlier this evening. May the injured recover at the earliest. Those affected are being assisted by authorities. Reviewed the situation with Home Minister Amit Shah Ji and other officials.@AmitShah
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2025
एका संशयिताला ताब्यात घेतले :
दिल्ली पोलीसांच्या सुत्रांनी हा हल्ला नियोजित कट असून दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवला आहे. अशातच आता स्फोटाच्या वेळी कारमध्ये असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला गंभीर अवस्थेत एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे. यातून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
घटनास्थळावरून स्फोटक साहित्य, वायरिंग आणि बॅटरीचे तुकडे ताब्यात :
या हल्ल्यानंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून स्फोटक साहित्य, वायरिंग आणि बॅटरीचे तुकडे ताब्यात घेतले आहेत. घटनास्थळी या वस्तू सापडल्यामुळे हा स्फोट हाताने घडवला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर आता हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
The post Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोटानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिकिया आली समोर, वाचा…. appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











