पुसेगावमध्ये रस्ता रोको आंदोलनानंतर कामाला सुरुवात; आमदार महेश शिंदेंच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या प. पू. सेवागिरी महाराजांचा रथोत्सव डिसेंबरमध्ये असूनही रस्त्याचे काम प्रलंबित असल्यामुळे सातारा पंढरपूर महामार्गावरील पुसेगाव येथे आज सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ यांनी रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

दरम्यान, गावातील बाधित लोकांनी स्वतः आपली जागा उपलब्ध करून देऊन रस्त्याचे काम चालू केले. यावेळी आमदार महेश शिंदे यांनी श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ केला. या लढाईत युवकांचा मोठा पाठिंबा दिसून आला. यावेळी पुसेगाव पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

The post पुसेगावमध्ये रस्ता रोको आंदोलनानंतर कामाला सुरुवात; आमदार महेश शिंदेंच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!