
Terrorist | white collar network – जम्मू काश्मीर, हरियाणा व उत्तर प्रदेशात पसरलेल्या दहशतवाद्यांच्या ‘व्हाईट कॉलर’ नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात केंद्रीय एजन्सीसह पोलीसांना यश मिळाले आहे. जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंद या दोन्ही दहशतवादी संघटनांशी संबंधीत असलेल्या 8 लोकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 2900 किलोंची स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. रविवारी गुजरातमध्ये दहशतवादी विरोधी पथकाने ३ दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर दुसर्याच दिवशी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीर, हरियाणा व उत्तर प्रदेश पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणेने ही संयुक्त कारवाई केली. गेल्या 15 दिवसांपासून एकत्रितपणे या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. प्रथम लखनौ येथून डॉ. शाहीनला अटक करण्यात आली. तिच्या गाडीमध्ये एके-47 अढळून आली होती. त्यानंतर तिच्यासह असणार्या इतरांना देखील अटक करण्यात आली.
यामध्ये काश्मीर येथील डॉ. मुझम्मिल गनी याचा देखील समावेश होता. अटकेनंतर दोघांनाही तातडीने विमानाने श्रीनगर अधिक चौकशीसाठी पाठवण्यात आले. या अटकेने भारतातील बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि आयसिसची शाखा असलेल्या अन्सार गजवत-उल-हिंद (एजीयूएच) या दोन्ही दहशतवादी गटांचे विध्वंसक कट उधळून लावण्यात पोलीस यंत्रणेला मोठे यश मिळाले.
काश्मीर येथील रहिवासी असलेल्या डॉ. मुझम्मिल गनी याने फरिदाबादमध्ये एक भाड्याने सदनिका घेतली होती. या सदनिकेतून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली असून यामध्ये अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरचा समावेश आहे. जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये ३६० किलो ज्वलनशील पदार्थ असलेला अमोनियम नायट्रेट असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
यासोबतच काही शस्त्रे देखील अढळून आली आहेत. यामध्ये एक चायनीज स्टार पिस्तूल, एके ५६ रायफल, एके क्रिन्कोव्ह रायफल, तीन मॅगझिन, ८३ जिवंत काडतुसे स्फोटके, आठ जिवंत काडतुसे असलेली एक पिस्तूल, रसायने, ज्वलनशील पदार्थ, इलेक्ट्रॉनिक सर्किट, बॅटरी, वायर, रिमोट कंट्रोल, एक वॉकी टॉकी सेट, 20 टायमर आणि धातूच्या चादरी आदी गोष्टी त्या सदनिकेतून जप्त करण्यात आल्या आहेत.
पोस्टर ठरले तपासाचा प्रारंभबिंदू :
हरियाणामध्ये असलेल्या अल फलाह विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या डॉ. मुझम्मिल गनी याने बनपोरा नौगाम या भागांमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणारे काही पोस्टर्स लावली होती. ज्याद्वारे पोलीस व सुरक्षा दलांना धमकवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जम्मू-काश्मीर पोलीसांनी या पोस्टर्स लावणार्या व्यक्तीचा शोध घेतला, हाच तपासाचा हा प्रारंभबिंदू ठरला. त्याला वॉन्टेड घोषीत केले होते. त्याला अटक करण्यात आली, त्यामुळे आंतर-राज्य दहशतवादी नेटवर्कचा उलगडा झाला. अटकेनंतर डॉ. मुझम्मिल गनी व डॉ. अदील या दोघांच्या मोबाईलमध्ये अनेक पाकिस्तानी संपर्क असल्याचे अढळून आले आहे. त्यामुळे ते दोघे दहशतवादी संघटनांचे हँडलर असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पांढरपेशी दहशतवादी संस्था :
या प्रकरणामध्ये पकडण्यात आलेले सर्वच दहशतवादी हे उच्च शिक्षित असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच ही पांढरपेशी दहशतवादी संस्था उघडकीस आली आहे. यामध्ये अटक करण्यात आलेले अनेकजण हे कट्टरपंथी व्यवसायिक, पाकिस्तानमधील विद्यार्थी तसेच इतर देशांमध्ये कार्यरत असलेल्या परदेशी हँडलरच्या संपर्कात असल्याचे जम्मू काश्मीर पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
हे आपली शिकवण, समन्वय, पैशाची देवानघेवान आणि इतर रसद मिळवण्यसाठी सुरक्षित (एन्क्रिप्टेड) चॅनल्सचा वापर करत होते. यांनी सामाजिक व धर्मादाय कारणांच्या नावाखाली व्यावसायिक व शैक्षणिक जाळे विकसीत करताना निधीची उभारणी केली होती. व्यक्तींची ओळख पटवणे, त्याला कट्टरपंथी बनविणे, दहशतवादी गटात भरती करणे, निधी उभारणे, रसद व्यवस्था उभारणे, शस्त्रे/दारूगोळा आणि आयईडी तयार करण्यसाठी साहित्य खरेदी करण्यात यांचा हात असल्याचे पोलीसांनी सांगितले
अटक करण्यात आलेल्यांची नावे पुढील प्रामाणे :
१ – आरिफ निसार दार उर्फ साहिल – नौगाम (श्रीनगर)
२ – यासिर-उल-अशरफ – नौगाम (श्रीनगर)
३ – मकसूद अहमद दार उर्फ शाहिद – नौगाम (श्रीनगर)
४ – मौलवी इरफान अहमद – शोपियान
५ – जमीर अहमद अहंगर उर्फ मुतलाशा – वाकुरा (गंदेरबल)
६ – डॉ. मुझम्मिल अहमद गनी उर्फ मुसैब – कोइल (पुलवामा)
७ – डॉ. अदील – वानपोरा (कुलगाम)
८ – डॉ. शाहीन – लखनौ (उत्तर प्रदेश)
The post Terrorist : दहशतवाद्यांचे ‘व्हाईट कॉलर’ नेटवर्क उध्वस्त; 2900 किलो स्फोटके जप्त, आठ जण ताब्यात appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











