Bangladesh Blast : बांगलादेशात ग्रामीण बँकेच्या मुख्यालयाबाहेर क्रूड बॉम्बचा स्फोट

Bangladesh Blast
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ढाका : बांगलादेशचे हंगामी मुख्य सल्लागार डॉ. मुहम्मद युनूस यांनी स्थापना केलेल्या ग्रामीण बँकेच्या मुख्यालयाबाहेर आज क्रूड बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला. मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी या बँकेच्या आवारात हा क्रूड बॉम्ब फेकला, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना पहाटे पावणे ४ वाजण्याच्या सुमारा सघडली. त्यावेळी बँकेच्या आवारात कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे या क्रूड बॉम्बच्या स्फोटामध्ये कोणीही जखमी झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

बांगलादेशात राजकीय पटलावर अलिकडच्या काळात खूप उलट सुलट घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाढलेल्या तणावामध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडू लागल्या आहेत. ग्रामीण बँकेच्या आवारात क्रूड बॉम्ब फेकला जाण्याची घटना ही त्यापैकी एक असल्याचे मानले जाते आहे. ग्रामीण बँक आणि मत्स्योद्योग आणि पशुपालन सल्लागार फरिदा अख्तर यांच्या प्राबारताना या उद्योगासमोर देखील क्रूड बॉम्ब फेकण्यात आले होते.

दोन्ही बॉम्पच्या स्फोटांमुळे मोठे आवाज झाले. ढाका शहरातील उच्चभ्रू धानमोंडी बागातही दोन क्रूड बॉम्ब फेकण्यात आले. जमात-ए-इस्लामीकडून चालवण्यात येणाऱ्या सिना हॉस्पिटलजवळ आणि जवळच्या एका मुख्य चौकात हे बॉम्ब फेकण्यात आले. याशिवाय पूर्वी गुन्हेगारीशी संबंधित असलेल्या एका व्यकीतची गोळ्या गालून हत्या करण्यात आली. सर्व प्रकरणातील हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. डॉ. युनूस यांनी १९८३ साली या ग्रामीण बँकेची स्थापना केली होती. दारिद्र्य निवारणासाठी त्यांनी केलेल्या या कामासाठीच त्यांना २००६ मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

The post Bangladesh Blast : बांगलादेशात ग्रामीण बँकेच्या मुख्यालयाबाहेर क्रूड बॉम्बचा स्फोट appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!