Typhoon Fung-wong : फुंग-वोंग चक्रिवादळामुळे फिलिपीन्समध्ये ४ ठार; तब्बल १४ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Philippines – फुंग-वोंग चक्रिवादळाने फिलिपीन्सच्या वायव्येकडील भागाला तडाखा दिला असून मुसळधार पाऊस, पूरआणि भूस्खलनामध्ये किमान ४ जण ठार झाले आहेत. वादळामुळे देशाच्या काही प्रांतातील वीज पुरवठा खंडीत झाला असून तब्बल १४ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. हे चक्रिवादळ आता वायव्येकडील तैवानच्या दिशेने सरकरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

फिलिपीन्स कलमायगी चक्रिवादळाच्या प्रभावातून बाहेर पडत आहे. कलमायगी वादळामुळे २२४ जण ठार झाले आहेत. त्याचवेळी फुंग-वोंग चक्रिवादळाने ताशी १८५ किलोमीटर वेगाने फिलिपीन्सच्या उत्तरेकडील भागाला जोरदार तडाखा दिला आहे. मात्र या भागात अनेक डोंगरदऱ्या असल्यामुळे या वादळाचा प्रभाव लवकरच कमी झाला. मात्र या भागातल्या शेतजमिनीचे मोठे नुकसान वादळामुळे झाले आहे. त्यानंतर हे वादळ पुढे निघून गेले.

पूर्वेकडील कातान्दुआन्स प्रांतात पूरामध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला आणि कॅटबालोगोन शहरात घर कोसळल्याने आणखी एक महिला मरण पावली. नुएवा विझकोये भागात दरड कोसळल्याने डोंगरपायथ्याशी असलेल्या झोपड्या गाडल्या गेल्या आणि दोन मुले मरण पावली.

तब्बल १४ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर ३ लाखांपेक्षा जास्त लोक अजूनही आश्रय छावण्यांमध्येच रहात आहेत. भयंकर वारे आणि पावसामुळे १३२ गावांमध्ये पूर आला आहे. तर एक हजार घरांचे नुकसान झाले आहे. भूस्खलनामुळे काही महामार्गांवरील वाहतूक देखील खंडीत झाली आहे.

जपान, अमेरिकेकडून मदतीची तयारी
लागोपाठ दोन चक्रिवादलांचा तडाखा बसल्यामुळे फिलिपीन्समध्ये मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी फिलिपीन्सने अद्याप आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन केलेले नाही. पण अमेरिका, जपान आणि संयुक्त राष्ट्राच्या मदत एजन्सींनी फिलिपीन्सला मदत देण्याची तयारी दाखवली आहे.

गेल्या आठवड्यापासून एकूण ३२५ आंतरराष्ट्रीय आणि ६१ देशांतर्गत विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तटरक्षक दलाने जहाजांनाही प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे विमानतळांवर आणि बंदरांवर सुमारे ६,६०० प्रवासी ताटकळत अडकून पडले होते.

The post Typhoon Fung-wong : फुंग-वोंग चक्रिवादळामुळे फिलिपीन्समध्ये ४ ठार; तब्बल १४ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!