
Rupali Thombare Patil | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत रुपाली ठोंबरे पाटील यांनी सातत्याने टीका केली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने रुपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानंतर पक्षाने नोटीस बजावली नसून खुलासा पत्र दिल्याची सारवा सारव रुपाली पाटील यांनी केली होती.
मात्र ठोंबरे पाटील यांचा खुलासा येण्यापूर्वीच राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. राष्ट्रवादीने त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली आहे. राष्ट्रवादीने आज नव्या 17 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन प्रवक्त्यांच्या यादीमध्ये रुपाली ठोंबर यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे ठोंबरे पाटील पक्षाला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. अशातच, उद्धव ठाकरे यांच्याकडून ठोंबरे पाटील यांना खुली ऑफर देण्यात आली आहे.
रुपाली ठोंबरे या माझ्या चांगल्या मैत्रिण आहेत. त्यांनी शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त करावी, आम्ही त्याचं स्वागत करू, असं विधान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील अजित पवारांची साथ सोडून उद्धव ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय गोटात रंगली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
रूपाली ठोंबरे ही माझी चांगली मैत्रीण आहे आणि ती राहील. तिला कोणतेही भीती नाही, ईडी किंवा सीबीआयचा तिला बॅकेज नाही. सर्वार्थाने ती अतिशय क्लीन इमेज असलेली व्यक्ती आहे. अशी महिला कुठल्याही पक्षात येणं कोणालाही आवडेलच. पण माझ्या पक्षात ती यावी म्हणून तिच्या त्या पक्षात नुकसान व्हावं असा विचार करणारी मी नाही. जर तिच्या पक्षात तिला स्कोप मिळत असेल तर तिनं तिथे काम करावे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रतिक्रिया काय?
नमस्कार जय महाराष्ट्र…मी आज पुण्याच्या बाहेर आहे,प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे. त्यात माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत.या यादी बद्दल अजित पवारांना भेटून बोलून या विषयी माहिती घेईल मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल, असं रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या.
कोणावर सोपवली प्रवक्तेपदाची जबाबदारी ?
राष्ट्रवादीने अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सुरज चव्हाण, विकास पासलकर आणि श्याम सनेर यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे.
The post Rupali Patil Thombare : रुपाली ठोंबरे पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











