मोबाईलमध्ये शून्य बॅलन्स असतानाही तुम्ही कॉल करू शकता आणि मेसेज पाठवू शकता हे तुम्हाला माहित आहे का? बॅलन्स तर सोडाच, तुम्हाला सिम किंवा नेटवर्कचीही गरज लागणार नाही. हे अगदी सहद शक्य आहे. आज आपण स्मार्टफोनमधील “बीकन लिंक” नावाच्या एका खास फीचरबद्दल जाणून घेणार आहोत. यामुळे तुम्ही सिम, नेटवर्क किंवा रिचार्जशिवाय तासन्तास बोलू शकता आणि मेसेजसही पाठवू शकता. ही टेक्नॉलॉजी नेमकी काय आणि कशी काम करते ते जाणून घेऊया.
खास फीचर : हे एक खास फीचर आहे जे वेगवेगळे ब्रँड त्यांच्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या नावांनी देतात. हे फीचर सर्व स्मार्टफोनवर उपलब्ध नाही, परंतु बहुतेक चिनी फोनवर ते उपलब्ध आहे. तसेच, OnePlus, Oppo आणि Realme स्मार्टफोन्समध्ये Beacon Link या नावाने हे फीचर दिले जाते. Infinix आणि Tecno स्मार्टफोन्समध्ये या फीचरला Ultra Link असे म्हणतात. शिवाय, हे फीचर Vivo फोन्समध्ये देखील उपलब्ध आहे. जरी प्रत्येक ब्रँडने त्याला वेगळे नाव दिले असले तरी त्याचे काम सारखेच आहे. हे फीचर असेल तर तुम्ही सिम कार्ड किंवा नेटवर्कशिवाय एकमेकांना कॉल करू शकता. पण या फीटरलाही काही मर्यादा आहेत.
वर उल्लेख केलेल्या स्मार्टफोन ब्रँडमध्ये सिम कार्ड किंवा नेटवर्कशिवाय कॉल करण्याची क्षमता आहे, यात काही शंका नाही, परंतु ते फक्त एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच काम करतं. तुम्ही ते सिम किंवा नेटवर्कशिवाय वॉकी-टॉकी म्हणून विचार करू शकता. जर तुम्ही रेंजमध्ये असाल तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला कॉल करण्यासाठी किंवा मेसेज पाठवण्यासाठी याचा वापर करू शकता. हे फीचर वापरताना लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते एकाच ब्रँडच्या फक्त दोन स्मार्टफोनवरच वापरले जाऊ शकते.
सोप्या शब्दांत सांगायचे तर, जर तुम्ही OnePlus फोनवर हे फीचर वापरत असाल, तर दुसऱ्या व्यक्तीकडे देखील OnePlus फोन असणे आवश्यक आहे.
हे फीचर वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. नंतर मोबाइल नेटवर्कवर टॅप करा आणि नंतर Beacon Linkवर टॅप करा.
नंतर बीकन लिंक फीचर चालू करा. आता तुम्ही हे फीचर फक्त तुमच्या संपर्कांसाठी वापरायचे की ते सर्वांसाठी चालू ठेवायचे हे निवडू शकता.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या रेंजमधील असे डिव्हाईस दिसतील ज्यात बीकन लिंक फीचर चालू आहे आणि तुम्ही त्यांना सहजपणे कॉल किंवा मेसेज करू शकता.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.


















