
Jolly LLB 3 | अभिनेता अक्षय कुमार व अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलएलबी ३’ हा सिनेमा आता ओटीटीवर पाहता येणार आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट १४ नोव्हेंबरला ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ व ‘जिओ हॉटस्टार’वर पाहता येईल.
‘जॉली एलएलबी 3’हा कॉमेडी कोर्टरूम ड्रामा आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी वकिलांच्या भूमिकेत दिसत आहे. या वेळी कथानकात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी आमनेसामने येतात. कोर्टरूममधील त्यांचा विनोदी वाद आणि त्यातून उभा राहणारा गंभीर प्रश्न या गोष्टींमुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.
‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा हा तिसरा भाग असून, यापूर्वीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तर, या तिसऱ्या भागात अक्षय कुमार, अर्शद वारसी, अमृता राव, सौरभ शुकला, हुमा कुरेशी, सीमा बिस्वास, गजराज राव हे कलाकार पाहायला मिळतात. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळाला होता. Jolly LLB 3 |
सोशल मीडियावर प्रेक्षकांनी अक्षय कुमारच्या अप्रतिम कॉमिक टायमिंगचं कौतुक केलं असून, अर्शद वारसीलाही तितकीच दाद दिली आहे. सौरभ शुक्लाच्या दमदार अभिनयाला तर संपूर्ण कथानकाचा आत्मा असं वर्णन केलं जात आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे. Jolly LLB 3 |
हेही वाचा:
‘या’ मुस्लिम देशाला भीषण दुष्काळाचा फटका ; खासदारांनी दुष्काळासाठी महिलांना जबाबदार ठरवले
The post ‘जॉली एलएलबी ३’ ओटीटीवर येण्यास सज्ज; कधी आणि कुठे पाहता येणार? appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











