
Girija Oak | अभिनेत्री गिरीजा ओकने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सिने इंडस्ट्रीत मोठे यश मिळवले आहे. लवकरच तिचा ‘थेरपी शेरपी’ ही वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत ‘कांतारा : चाप्टर 1’मधील अभिनेता गुलशन देवैय्या मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात दोघांनी इंटिमेट सीन्स केले आहेत. याबाबत तिने एका मुलाखतीदरम्यान काही अनुभव सांगितले आहे. यावेळी तिने गुलशनचे कौतुक केलं आहे.
अभिनेत्री म्हणाली, “तुम्ही कितीही तयारी केली तरी, असे फार कमी लोक असतात ज्यांच्यासोबत तुम्हाला थोडेसेही अनकंफर्टेबल वाटत नाही आणि गुलशन त्यापैकी एक आहे. त्याने त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधून तीन ते चार उशा आणल्या: एक लहान, एक मोठी, एक मऊ आणि एक थोडीशी कडक, आणि मला सर्वात चांगली वाटणारी उशी निवडण्यास सांगितले. शूटिंग दरम्यान, त्याने मला सुमारे १६-१७ वेळा विचारले, ‘तू ठीक आहेस ना?’”
View this post on Instagram
गिरिजा पुढे म्हणाली की, “जेव्हा एखाद्या सीनदरम्यान उशीमुळे तिला अनकंफर्टेबल वाटायचं, तेव्हा गुलशन म्हणायचा, तुला अधिक त्रास होत असेल तर आपण ही उशी काढून टाकुयात, मला काहीच समस्या नाही. त्याचं हे वागणं आणि त्याने दिलेला आदर पाहून मी खूप प्रभावित झाले. त्याच्या जागी जर दुसरा कोणता अभिनेता असता तर कदाचित कठीण वाटलं असतं. पण गुलशनने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली होती. आता मी त्याबद्दल मोकळेपणे बोलू शकते. कारण त्याच्यासोबत मला खूप सुरक्षित वाटत होतं.” Girija Oak |
दरम्यान, गिरिजाने ‘तारे जमीन पर’, ‘जवान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती ‘थेरपी शेरपी’ वेब सीरिजमध्ये गुलशन देवैयासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. Girija Oak |
हेही वाचा :
जरांगेंच्या हत्येचा कट; आरोपीचा आणखी एक व्हिडिओ समोर, संतोष देशमुखांच्या भावाला २० कोटी रुपयांची ऑफर
The post गिरीजा ओकने ‘कांतारा’मधील अभिनेत्यासोबत दिले इंटिमेट सीन्स; म्हणाली… appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











