TET Exam : टीईटी परीक्षेची तारीख जाहीर ; या तारखेला होणार परीक्षा, उद्यापासून हॉल तिकीट मिळणार

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शिक्षक बनण्यासाठी आवश्‍यक असणारी टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला होत असून अर्ज भरलेल्या उमेदवारांना सोमवार (दि.१०) पासून हॉल तिकीट मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांची नोकरी करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. तसेच सेवेत असणाऱ्यांनाही दोन वर्षाच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. यामुळे टीईटी परीक्षार्थींची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत १ लाख २१ हजाराने वाढली आहे.

राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर राज्य परीक्षा परिषदा टीईटी परीक्षा घेणार आहे.गेल वर्षी ३ लाख ५३ हजार ९५२ जणांनी १ हजार २३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली होती. यंदा ४ लाख ७५ हजार ६६८ जण १ हजार ४२० केंद्रांवर परीक्षा देतील. परीक्षा २३ नोव्हेंबरला असल्याने नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठीचे प्रशिक्षण २२ व २३ नोव्हेंबर रोजी आयोजित करू नये, अशी मागणी राज्य परीक्षा परिषदेने केली आहे.

The post TET Exam : टीईटी परीक्षेची तारीख जाहीर ; या तारखेला होणार परीक्षा, उद्यापासून हॉल तिकीट मिळणार appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!