Leopard Cubs : ऊस तोडताना अचानक समोर आले बिबट्याचे दोन बछडे, परिसरात खळबळ

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
उदापूर – येथील ढग वस्तीवर रविवारी ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्याने ऊसतोड कामगार, शेतकरी आणि परिसरातील शेतीत काम करणाऱ्या महिला मजूरांची एकच धांदल उडाली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली होती.सुनिल उल्हास कुलवडे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना, निम्मा ऊस तोडल्यानंतर कामगारांना बिबट्याचे बछडे आढळले. याबाबत ओतूर वनविभागाला सकाळी नऊच्या दरम्यान माहिती मिळाली.

त्यानंतर ओतूरचे वनक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक मोहिनी वाघचौरे, वनमजूर गंगाराम जाधव यांच्यासह पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.ऊसतोड कामगारांनी एका बछड्याला पकडून प्लास्टिक कॅरेटमध्ये ठेवले होते. त्यानंतर आणखी एक बछडा ऊसात आढळला, त्यालाही कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे पहिल्या बछड्याजवळ कॅरेटमध्ये ठेवले.

आणखी बछडे असू शकतात या भीतीने कामगारांनी ऊसतोड थांबवली होती, मात्र वनविभागाचे कर्मचारी पूर्ण ऊस तोड होईपर्यंत शेतात थांबून राहिले. सुदैवाने आणखी बछडे आढळले नाहीत. हे दोन्ही बछडे अंदाजे एक ते दीड महिन्याचे असून, बिबट मादी शेजारच्या ऊसाच्या शेतात असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

The post Leopard Cubs : ऊस तोडताना अचानक समोर आले बिबट्याचे दोन बछडे, परिसरात खळबळ appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!