Shikrapur News : जातेगाव बुद्रुकमध्ये धक्कादायक घटना; घरातील सर्वजण टीव्ही पाहत होते, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

-dead-body
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे शंकर दिलीप आत्रे (वय ३६) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरात सर्व कुटुंबीय टीव्ही पाहत असताना ही घटना घडली असून, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.शंकर आत्रे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जेवण केल्यानंतर सर्वजण टीव्ही पाहत बसले होते. यावेळी शंकर वरच्या मजल्यावरील खोलीत गेला होता. रात्री उशिरा शंकरला आवाज दिला असता आतून प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे त्याचा भाऊ अक्षय याने खिडकीतून पाहिले असता, शंकरने दोरीने गळफास घेतल्याचे दिसले.त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी शंकर दिलीप आत्रे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत अक्षय दिलीप आत्रे यांनी शिक्रापूर पोलिसात खबर दिली असून, पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बापू हाडगळे करत आहेत.

The post Shikrapur News : जातेगाव बुद्रुकमध्ये धक्कादायक घटना; घरातील सर्वजण टीव्ही पाहत होते, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!