
प्रभात वृत्तसेवा
मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून, सोमवार, दि.१० पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली कुलकर्णी यांनी दिली.मंचर नगरपंचायत कार्यालयात निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत विविध राजकीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्यासह विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उमेदवारांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोनही पद्धतीने अर्ज भरून सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, तसेच विविध कागदपत्रे व घोषणापत्रे जोडणे आवश्यक आहे. एक खिडकी योजनेतून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज भरून सादर करणे आवश्यक आहे. ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्या अनुषंगाने शहरातील सर्व फ्लेक्स, बॅनर्स काढून टाकले असून, नावांच्या पाट्या, कोनशिला झाकून टाकल्या आहेत.
आता विनापरवाना पत्रके, फ्लेक्स, बॅनर्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मतदारांना पैसे वाटप, विविध प्रलोभने, धाकदपटशा दाखवणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.उमेदवारांना नगराध्यक्षपदासाठी सहा लाख रुपये आणि नगरसेवक पदासाठी दोन लाख पंचवीस रुपये खर्चाची मर्यादा आहे. शहरातील नागरिक व राजकीय पक्षांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यावा.निवडणूक शांततेत, सुव्यवस्थित पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद जाधव यांनी केले.
सूचकासाठी सूचना..
नगराध्यक्षपदासाठी सूचक शहराच्या कोणत्याही प्रभागातील मतदार असू शकतो. सदस्य पदासाठी सूचक हा उमेदवार उभा असलेल्या त्याच प्रभागातील मतदार यादीत असणे आवश्यक आहे. एका मतदाराला फक्त एकदाच सूचक होता येईल. एकापेक्षा जास्त उमेदवारांना एकच मतदार सूचक असल्याचे आढळून आल्यास, ते सर्व अर्ज बाद ठरविले जाणार.
उमेदवारासाठी अनामत रक्कम-
-खुला प्रवर्ग : एक हजार रुपये.
-खुला सोडून इतर सर्व प्रवर्ग : ५०० रुपये.
The post Manchar News : मंचर नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











