
प्रभात वृत्तसेवा
खालापूर – आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. माजी नगरसेवक किशोर पानसरे आणि युवा फाउंडेशनच्या संस्थापिका माधुरी तांबे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला आहे.रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत, तसेच रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या दोघांनी पक्ष प्रवेश केला.
या प्रवेशामुळे खोपोलीसह संपूर्ण खालापूर तालुक्यात नवीन चर्चेची लाट उसळली आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्ष आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत आहेत. अशा वेळी किशोर पानसरे आणि माधुरी तांबे यांचा प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मास्टर स्ट्रोक ठरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पक्षप्रवेशावेळी मंत्री आदिती तटकरे, माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील, दत्तात्रेय मसुरकर, अशोक भोपतराव, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, विधानसभा अध्यक्षा आश्विनी पाटील, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, कार्याध्यक्ष भूषण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
The post राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘मास्टरस्ट्रोक’! खोपोलीत किशोर पानसरे आणि माधुरी तांबे यांच्या पक्षप्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार? appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











