
Vipraj Nigam Files Blackmail Complaint : आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून धमाकेदार कामगिरी करणारा युवा अष्टपैलू क्रिकेटर विप्रज निगम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला ब्लॅकमेलिंगचा सामना करावा लागत असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून त्याला सातत्याने धमक्या येत असून, त्याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नेमके काय घडले? ब्लॅकमेलिंगचा आरोप –
मूळचा उत्तर प्रदेशच्या हैदरगढ परिसरातील रहिवासी असलेल्या विप्रजने रविवारी बाराबंकी नगर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या संपूर्ण घटनेची लेखी तक्रार नोंदवली आहे. विप्रज निगमने एका तरुणीवर ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विप्रजने सांगितले की, ही तरुणी त्याच्या खासगी आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करत आहे. तिने विप्रजकडे काही अनुचित मागण्या केल्या, ज्या त्याने पूर्ण करण्यास नकार दिल्यावर तिने त्याचे खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
विप्रज निगमने त्या तरुणीचा नंबर ब्लॉक केल्यानंतर हे संकट अधिक वाढले. त्याला लगेचच आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून सतत कॉल्स आणि मेसेजेस येण्यास सुरुवात झाली. या कॉल्समध्ये त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सार्वजनिकरित्या बदनाम करण्याची आणि त्याचे क्रिकेट कारकीर्द खराब करण्याची धमकी दिली जात आहे. विप्रजच्या म्हणण्यानुसार, हे सर्व त्याच्या कारकिर्दीला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि त्याला मानसिकदृष्ट्या खचवण्यासाठी केलेले सुनियोजित षडयंत्र आहे.
पोलिसांकडून गंभीर दखल, सायबर सेलची मदत –
नगर कोतवाली येथे दाखल झालेल्या विप्रजने पोलीस स्टेशनचे प्रभारी सुधीर कुमार सिंह यांना या घटनेची सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. सुधीर कुमार सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणातील डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जात आहे. कॉल डिटेल्स, मेसेजेस आणि संबंधित क्रमांकांचा तपास करण्यासाठी सायबर सेललाही या तपासात समाविष्ट करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कॉल्समुळे तपासादरम्यान परदेशी एजन्सींची मदत घ्यावी लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
The post Vipraj Nigam : दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू ब्लॅकमेलिंगचा शिकार; आंतरराष्ट्रीय नंबरवरून धमक्या, पोलिसांत तक्रार दाखल appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











