मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर? ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ; मुंबई पोलिसांनी केला खुलासा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Uddhav Thackeray – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री परिसरात ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगु लागल्‍या आहेत.

मातोश्री बंगल्याच्या बाहेर जी जागा संवेदनशील म्हणून आहे, अशा ठिकाणी असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण हे ड्रोन नेमके येथे काय करत होते याबाबत मुंबई पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

वांद्रे येथील मातोश्री बंगल्याशेजारील परिसरात एक अज्ञात ड्रोन घिरट्या घालताना आढळून आले. खरंतर या परिसरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन किंवा हवाई साधन उडवण्यास बंदी आहे. अशातच ठाकरेंच्या सुरक्षेच्या दृष्टीने मातोश्री हा उच्च सुरक्षा झोन असल्याने हा प्रकार गांभीर्याने घेतला जात आहे. या प्रकारामुळे चर्चांना उधाण आले आहे.

या ड्रोनबाबत मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे. एमएमआरडीएच्या परवानगीनेच हे ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. ड्रोनचे हवाई उड्डाणाचे कारणही पोलिसांनी सांगितले. एमएमआरडीएचे सर्वेक्षण सुरू होते. त्यामुळे हे ड्रोन उडवण्यात आले, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या प्रकारानंतर ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवरून मातोश्री परिसरात ड्रोनचे हवाई उड्डाणाचा व्हीडीओ पोस्ट केला आहे. मातोश्रीवरील सुरक्षा रक्षकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा व्हीडीओ शूट केला. त्यामुळे मातोश्रीवरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा दानवे यांनी पोस्टमध्ये केला आहे.

सहानुभूतीसाठी रचलेले कुभांड
आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याचा ठाकरेसेनेचा हा प्रयत्न आहे. सरकारच्या विकासावर बोलू शकत नाही. सरकारवर टीका करायला मुद्दे नाही.

त्यामुळे फेक नॅरेटीव्ही सेट करुन सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेले कुभांड आहे. लोकसभेलाही त्यांनी अशाच प्रकारे फेक नॅरेटीव्ही रचले होते, असाही आरोप भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी केला.

The post मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर? ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ; मुंबई पोलिसांनी केला खुलासा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!