
Akash Kumar Choudhary Record Breaking Fifty : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात रविवारी (आज) एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. रणजी करंडक प्लेट गटातील मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामन्यात हा विक्रम रचला गेला. या सामन्यात मेघालयचा फलंदाज आकाश कुमार चौधरी याने फर्स्ट-क्लास क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
२५ वर्षीय उजव्या हाताच्या या फलंदाजाने अवघ्या ११ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी, २०१२ मध्ये लीसेस्टरशायरकडून खेळताना इंग्लंडच्या वेन व्हाइट यांनी १२ चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम केला होता. आकाश चौधरीने हा १३ वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी, भारतीयांमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या बंदेव सिंह यांच्या नावावर १५ चेंडूंमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रम होता, जो आकाशने सहज मोडला.
आठ चेंडूंमध्ये सलग ८ षटकार!
Record Alert
First player to hit eight consecutive sixes in first-class cricket
Fastest fifty, off just 11 balls, in first-class cricket
Meghalaya’s Akash Kumar etched his name in the record books with a blistering knock of 50*(14) in the Plate Group match against… pic.twitter.com/dJbu8BVhb1
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 9, 2025
आकाश चौधरी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला, तेव्हा मेघालयचा संघ ५७६ धावांवर खेळत होता (६ बाद). मात्र, मैदानात येताच आकाशने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. यादरम्यान आकाशने नोंदवलेला हा विक्रम केवळ रणजी ट्रॉफीचा नाही, तर फर्स्ट-क्लास क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक आहे.
- त्याने मैदानात उतरताच सलग ८ चेंडूंवर ८ षटकार ठोकले –
- यापैकी सहा षटकार त्याने गोलंदाज लीमर डाबीच्या एकाच षटकात लगावले.
- आकाश केवळ १४ चेंडूंमध्ये ५० धावांवर नाबाद राहिला.
- आकाशच्या या वादळी खेळीमुळे मेघालयने ६ बाद ६२८ धावांवर आपला डाव घोषित केला.
फर्स्ट-क्लास क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतके :
- ११ – आकाश कुमार चौधरी (मेघालय) – अरुणाचल प्रदेश – सूरत, २०२५
- १२ – वेन व्हाइट (लीसेस्टरशायर) – एसेक्स – लीसेस्टर, २०१२ १३ – मायकल व्हॅन वुरेन (इस्टर्न प्रोविन्स बी) – ग्रिकुआलैंड वेस्ट – क्रैडॉक, १९८४/८५
- १४ – नेड एकर्सली (लीसेस्टरशायर) – एसेक्स – लीसेस्टर, २०१२
- १५ – खालिद महमूद (गुजरांवाला) – सरगोधा – गुजरांवाला, २०००/०१
- १५ – बंदेव सिंह (जम्मू आणि काश्मीर) – त्रिपुरा – आगरतळा, २०१५/१६
हेही वाचा – Hong Kong Super Sixes : हाँगकाँग सुपर सिक्सेसमध्ये भारत सुपर फ्लॉप! पाकिस्तानने पटकावलं जेतेपद
गोलंदाजीतही चमकदार कामगिरी –
फलंदाजीसोबतच आकाश कुमार चौधरीने गोलंदाजीतही आपली चमक दाखवली. त्याने नवीन चेंडूने गोलंदाजी करताना लगेचच एक गडी बाद केला. आकाशसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला, तर अरुणाचल प्रदेशचा संघ अजूनही ५९३ धावांनी पिछाडीवर आहे.
The post Akash Kumar Choudhary : मेघालयाच्या पठ्ठ्याचा वर्ल्ड रेकॉर्ड! सलग ८ षटकार मारत अवघ्या ११ चेंडूत ठोकलं अर्धशतक, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.

Record Alert 










