Baby Care : रात्री बाळ रडले की आईच का जागी होते, वडील झोपून का राहतात? नेमकं उत्तर सापडलं!

Baby Care : रात्री बाळ रडले की आईच का जागी होते, वडील झोपून का राहतात? नेमकं उत्तर सापडलं!
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Baby Care : घरात लहान मुल झालं की पत्नी-पत्नीचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. बाळ झालं की त्याची काळजी घेण्यासाठी त्या बाळाच्या आई-वडिलांना जिवाचं रान करावं लागतं. बाळ रात्री कधीही उठतं. रडायला लागतं. बाळ जेव्हा रात्री रडतं तेव्हा तुम्हाला आईच रात्री-अपरात्री उठून त्याची काळजी घेताना दिसते. त्या बाळाचे वडील मात्र क्वचितच झोपेतून उठतात. हीच बाब अनेक महिलांना खटकते. नव्याने आई झालेली महिला तर माझ्या नवऱ्याला रात्री बाळाची काळजी घ्यावी वाटत नाही का? असा प्रश्न हमखास विचारतात. आता याच प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. रात्री बाळ रडायला लागले की वडील झोपून का राहतात हे एका डॉक्टरने सांगितलं आहे.

बाळ रडले तरी वडील का उठत नाहीत?

डॉ. रोहित भारद्वाज या बालरोग तज्ज्ञांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी रात्री बाळ रडायला लागल्यावर आईला लवकर का जाग येते. वडील झोपून का राहतात याचं कारण सांगितलं आहे. डॉक्टर भारद्वाज यांनी यूकेमध्ये झालेल्या एका संशोधनाचा आधार घेतला आहे. बाळाच्या काळजीसंदर्भात वडिलांचा वेगळा दृष्टीकोन हा बायोलॉजिकल आहे, असं या डॉक्टरने सांगितले. रात्री बाळ रडायला लागल्यावर वडील शक्यतो जागत नाहीत. कारण पुरुषामध्ये vasopressin हे संप्रेरक जास्त प्रमाणात सक्रिय असते. या संप्रेरकामुळे बाळाचे वडील डिफेन्सिव्ह (रक्षणाच्या) भूमिकेत जास्त असतात. त्यांचा अॅक्टिव्ह मोड लगेच ऑन होतो, असे या डॉक्टरचे मत आहे.

आई लगेच का उठते?

तर दुसरीकडे बाळाच्या आईमध्ये ऑक्सिटोसीन नावाचे संप्रेरक जास्त सक्रिय असते. त्यामुळे बाळ रडले की आईमध्ये लगेच बदल होतो. ती बाळाची काळजी घ्यायला लागते. याउलट बाहेर दरवाजा वाजला, काहीतरी पडलं की वडिलांना लगेच आवाज येतो. वडील लगेच जागे होतात, असे डॉ. भारद्वाज यांचे मत आहे.

दोघांचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा

दरम्यान, बाळाजी काळजी घेणे हे फक्त आईचेच नव्हे तर वडिलाचेही काम आहे. आई-वडील या दोघांच्याही सहभागामुळे बाळाची चांगली काळजी घेता येते. सोबतच आईचाही थकवा निघून जातो. विशेष म्हणजे घरात बाळ आल्याचा आनंद दोघांनाही उपभोगता येतो.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!