“२३० कोटी शुभेच्छा..!” मुरलीधर मोहोळांना वाढदिवसानिमित्त धंगेकरांचा खोचक टोला

Murlidhar Mohol Vs Ravindra Dhangekar |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Murlidhar Mohol Vs Ravindra Dhangekar |  मागील महिन्यात पुण्याच्या मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग हाउसच्या जमीनीचा विक्री व्यवहार चांगलाच चर्चेत होता. केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने या जमिनीचा खरेदी व्यवहार केला होता. याप्रकरणी जैन समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

यावरून जैन समाज बांधवानी मुरलीधर मोहोळ यांना धारेवर धरले होते. याशिवाय शिवसेनेचे (शिंदे) नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप केले. अखेर धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले. Murlidhar Mohol Vs Ravindra Dhangekar |

दरम्यान, व्यवहार रद्द झाल्यानंतर हे प्रकरण शांत झालं. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी या घटनेचा उल्लेख करत एक्सवर एक पोस्ट केली आहे. मुरलीधर मोहोळ यांचा आज ५१ वा वाढदिवस असल्याने रवींद्र धंगेकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देताना मोहोळ यांना चिमटा काढला आहे. रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की “हॅपी बर्थडे बरं का…! वाढदिवसाच्या २३० कोटी शुभेच्छा..! जय जिनेंद्र.”

दरम्यान, जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा व्यवहार २३० कोटी रुपयांमध्ये होणार होता. त्याचाच उल्लेख करत धंगेकरांनी २३० कोटी शुभेच्छा म्हणत टोला लगावला आहे. Murlidhar Mohol Vs Ravindra Dhangekar |

हेही वाचा: 

‘हिंदू धर्मही नोंदणीकृत नाही…’ ; RSS च्या नोंदणी वादात मोहन भागवत यांचे मोठे विधान

The post “२३० कोटी शुभेच्छा..!” मुरलीधर मोहोळांना वाढदिवसानिमित्त धंगेकरांचा खोचक टोला appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!