“स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही बंद, मध्यरात्री व्हॅनची एन्ट्री अन् एग्जिट” ; RJD च्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ उत्तर

Bihar Election।
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bihar Election। बिहारमध्ये  स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेत भंग झाल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात आला होता.त्यासाठी पक्षाकडून  सोशल मीडिया पोस्ट शेअर करण्यात अली होती. याच पोस्टवर आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. राजद कडून पोस्ट करण्यात आलेली माहिती ही दिशाभूल करणारी आणि तथ्यहीन असल्याचे म्हणत त्याचे आरोप म्हणून फेटाळून लावले आहेत.  राजदने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दावा केला होता की.” वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरमधील स्ट्रॉंग रूममधील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील सीसीटीव्ही फुटेज एक-एक करून बंद केले जातात. “मध्यरात्री, एक व्हॅन आत येते आणि बाहेर पडते,”  मात्र याच आरोपांना आयोगाने उत्तर दिले आहे.

निवडणूक आयोगाने राजदच्या या सोशल मीडिया पोस्टची दखल घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यात असे आढळून आले की स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठीचे सीसीटीव्ही फुटेज दोन ठिकाणी प्रदर्शित केले गेले होते: एक नियंत्रण कक्षात आणि दुसरे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसाठी आणि उमेदवारांसाठी नियुक्त केलेल्या क्षेत्रात स्ट्रॉंग रूमजवळ. नियंत्रण कक्षात सीसीटीव्ही फुटेज प्रदर्शित होत राहिले.

राजदच्या आरोपांना निवडणूक आयोगाचे उत्तर  Bihar Election। 

राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी नियुक्त केलेल्या क्षेत्रात, पाच विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या महनार मतदारसंघासाठी सीसीटीव्ही फुटेज फीड डिस्प्ले स्क्रीन ऑटो-टाइमआउटमुळे तात्पुरती बंद होती, परंतु काही मिनिटांतच ती पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान, नियंत्रण कक्षातील महनार मतदारसंघासाठी सीसीटीव्ही फुटेज डिस्प्ले स्क्रीन कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत राहिली.

निवडणूक आयोगाने सांगितले की, हाजीपूरमधील स्ट्राँग रूममध्ये पिकअप व्हॅन घुसल्याच्या आरोपांची चौकशी देखील करण्यात आली. मध्यरात्री सुरक्षा कर्मचाऱ्यांचे सामान, बेडिंग आणि अन्न यासह एक वाहन स्ट्राँग रूममध्ये घुसल्याचे उघड झाले आणि १५ मिनिटांत परत आले. हाजीपूर स्ट्राँग रूम एका कॉलेज कॅम्पसमध्ये आहे, जिथे निवडणूक आयोगाने त्रिस्तरीय सुरक्षा सुनिश्चित केली आहे.

सुरक्षा कर्मचाऱ्यांचे सामान घेऊन वाहनाही एन्ट्री  Bihar Election। 

स्ट्राँग रूममध्ये वाहनांचा प्रवेश आणि बाहेर पडण्याची नोंद कॉलेज कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या रजिस्टरमध्ये आहे. लालगंज विधानसभा मतदारसंघातील राजद उमेदवाराचे प्रतिनिधी कुंदन कुमार यांनीही या तथ्यांना पुष्टी दिली आहे. निवडणूक आयोगाने हाजीपूर स्ट्रॉंग रूमबाबत राजदच्या सोशल मीडिया पोस्टला निराधार आणि दिशाभूल करणारी म्हणून फेटाळून लावले आहे.

बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६५.०८% मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमधील १२१ विधानसभा मतदारसंघांमधील ४५,३४१ मतदान केंद्रांवर मतदान झाले. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यात ६५.०८ टक्के मतदान झाले. महिलांनी मतदानात उत्साहाने भाग घेतला. बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की यावेळी पहिल्या टप्प्यात मतदान २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीपेक्षा (५७.२९ टक्के) ७.७९ टक्के जास्त आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा (५६.२८ टक्के) ८.८ टक्के जास्त आहे.

बिहारने १९९८ चा मतदानाचा विक्रम मोडला

बिहारच्या मतदारांनी १९९८ च्या विधानसभा निवडणुकीचा विक्रम मोडला आहे, ज्यामध्ये ६४.६ टक्के मतदान झाले होते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी १२२ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होईल. या टप्प्यात औरंगाबाद, जहानाबाद, गया, नवादा, जमुई, भागलपूर आणि पूर्णियासह २० जिल्हे समाविष्ट आहेत.Bihar Election

The post “स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही बंद, मध्यरात्री व्हॅनची एन्ट्री अन् एग्जिट” ; RJD च्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ उत्तर appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!