आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांचे नाव घेत स्पष्टच सांगितले…

Aaditya Thackeray |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Aaditya Thackeray | ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याचदरम्यान मुंबई महापालिकेत ठाकरेसेनेची सत्ता आली तर आदित्य ठाकरे महापौर होणार अशी चर्चा रंगली आहे. या चर्चेवर स्पष्टीकरण देत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना अहमदाबादचा महापौर बनवण्याची चर्चा सुरु असल्याचा खोचक टोला लगावला.

आदित्य ठाकरे महापौर होण्याच्या चर्चांवर उद्धव ठाकरे म्हणाले की, “या बातमीचा उगम कुठून झाला हे मला कळून घ्यायचं आहे आणि मला ते कळलं. या अफवेचा उगम संघातून झाला. १० वर्ष झाली मोदी पंतप्रधान आहे, अमित शाह हे गृहमंत्री झाले. पण त्यांच्या अहमदाबाद शहराचं नाव बदलू शकले नाही. त्यामुळे अहमदाबादचं नाव बदलायचं आहे ही संघातली अंदरकी बात आहे आणि त्यासाठी मोदी किंवा शहाला अहमदाबादचा महापौर बनवावा लागेल. महाराष्ट्रात अहमदनगरचं अहिल्यानगर केलंय, तसंच अहमदाबादचं नाव का बदलं नाही, १० वर्ष झाली आहे. त्यामुळे आता मला बघायचं आहे महापौर अमित शाह होणार की नरेंद्र मोदी होणार,” असा मिश्किल टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

मुंबई महापालिकेसाठी भाजपनेही कंबर कसली

दुसरीकडे, मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपनं मित्रपक्षांसोबतही जुळवून घेण्याचे प्रयत्न केले आहे. तर मुंबईचा बालेकिल्ला राखण्यासाठी ठाकरे बंधूही एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

आदित्य ठाकरे हे सध्या वरळी विधानसभेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आहेत. 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पर्यावरण आणि पर्यटन खात्याचे ते मंत्री होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत दुसऱ्यांदा ते वरळीतून विजयी झाले.

हेही वाचा: 

Pimpri : उमेदवारी कोणाच्या हाती ? इच्छुकांची धाकधूक वाढली

The post आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांचे नाव घेत स्पष्टच सांगितले… appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!